Rishabh Pant: 6,4,6,6,6.. एका ओव्हरमध्ये 31 रन, पंतच्या खेळीला कुणाचीच नाही तोड!
DC vs GT IPL 2024 : 24 एप्रिल रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन संघातील सामन्यात ऋषभ पंत तुफानी अंदाजात दिसला. पंतच्या या खेळीमुळे 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी विकेटकीपर म्हणून त्याचे तिकीट निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

ऋषभ पंत शेवटच्या 5 ओव्हरमध्ये ठरला गेम चेंजर

दिल्ली कॅपिटल्सची अशी होती धावसंख्या

IPL इतिहासातील सर्वात महागडी गोलंदाजी
DC vs GT IPL 2024 : 24 एप्रिल रोजी झालेल्या दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन संघातील सामन्यात ऋषभ पंत तुफानी अंदाजात दिसला. जोपर्यंत त्याला संयमाने आणि जपून खेळावं, असं वाटलं तोपर्यंत तो त्या अंदाजात खेळला. पण, त्यानंतर त्याने फलंदाजीतून आपली तोफ काढत हल्लाबोल केला. हे पाहूनच गुजरातच्या गोलंदाजांचं टेन्शन वाढलं आणि त्यांना घाम फुटला. (IPL 2024 DC vs GT 31 runs in one over nobody can break Rishabh Pant's innings he did Record)
ऋषभ पंतने त्याच्या जबरदस्त खेळीने गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माची चांगलीच धुलाई केली. पंतने त्याच्या षटकात (डावाचे 20 वे षटक) 31 धावा (2,WD,6,4,6,6,6) केल्या. पंतच्या या खेळीमुळे 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी विकेटकीपर म्हणून त्याचे तिकीट निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा : Sangli Lok Sabha : ...म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने विशाल पाटलांवर केली नाही कारवाई
कर्णधार पंत (43 चेंडूत 88 धावा) आणि अक्षर पटेल (43 चेंडूत 66 धावा) यांनी 68 चेंडूत 113 धावांची भक्कम भागीदारी केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने प्रथम खेळताना 4 गडी गमावून 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन (29 चेंडूत 65 धावा) आणि डेव्हिड मिलर (23 चेंडूत 55 धावा) यांनी डाव खेळला.
शेवटी राशिद खानने 11 बॉलमध्ये नाबाद 21 धावा केल्या. गुजरातला विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती, पण रशीद खानने मुकेश कुमारच्या षटकात 14 धावा दिल्या. एक वेळ अशी होती जेव्हा गुजरात संघ जिंकेल असे सर्वांना वाटत होते, मात्र शेवटच्या चेंडूत रशीद खान मोठा शॉट मारण्यापासून कुठेतरी हुकला.