Marcus Stoinis ने रचला इतिहास, धोनीच्या संघाविरुद्ध मोडला 13 वर्ष जुना विक्रम!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL 2024 Marcus Stoinis : मार्कस स्टॉइनिसने 23 एप्रिल रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2024) पहिले शतक झळकावले. क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने (LSG) स्टॉइनिसला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोट केले आणि हा प्रयोग यशस्वी ठरला. (IPL 2024 LSG vs CSk Marcus Stoinis creates history breaks 13-year-old record against MS Dhoni's CSK team)

स्टॉइनिसने आपल्या तुफानी खेळीने संघाला निराश केले नाही आणि शतक झळकावले. स्टॉइनिसने 124 धावांची नाबाद खेळी खेळली. स्टॉइनिसने 63 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचवेळी त्याने शेवटच्या षटकात मुस्तफिजुर रहमानला चांगलच पछाडलं. अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी 17 धावांची गरज होती. पण स्टॉइनिसने 3 बॉल आधीच खेळ संपवला. यावेळी मार्कस स्टॉइनिसने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

चेन्नईत CSK विरुद्ध मार्कस स्टॉइनिसची नाबाद 124 धावांची धावसंख्या आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. त्याने आयपीएल 2011 मध्ये सीएसके विरुद्ध पंजाबच्या पॉल वल्थाटीच्या नाबाद 120 धावांच्या खेळीलाही आता मागे टाकलं आहे. IPL मध्ये CSK विरुद्धच्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येच्या बाबतीत स्टॉइनिस वीरेंद्र सेहवागच्याही पुढे गेला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चेन्नईत लखनौ सुपर जायंट्सने दिलेले 211 धावांचे लक्ष्य या मैदानावरील सर्वात मोठे धावांचे आव्हान आहे. अशाप्रकारे, 2012 मध्ये सीएसकेने आरसीबीविरुद्ध केलेले 206 धावांचे आव्हानही मागे राहिले. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने 210 धावा केल्या होत्या.

IPL मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

 • 124 - मार्कस स्टॉइनिस (लखनौ सुपर जायंट्स) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज, चेन्नई, 2024
 • 120 - पॉल वल्थाटी (पंजाब किंग्स) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज, मोहाली, 2011
 • 119 - वीरेंद्र सेहवाग (दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध डेक्कन चार्जर्स, हैदराबाद, 2011
 • 119 - संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स) विरुद्ध पंजाब किंग्ज, मुंबई वानखेडे, 2021
 • 117- शेन वॉटसन (चेन्नई सुपर किंग्स) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुंबई वानखेडे, 2018 फायनल

लखनौ सुपर जायंट्स (LSG)साठीचे सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर

 • 140 - क्विंटन डी कॉक विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई डीवाय पाटील स्टेडियम, 2022
 • 124- मार्कस स्टॉइनिस विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज, चेन्नई, 2024
 • 103 - केएल राहुल विरुद्ध मुंबई इंडियन्स, ब्रेबॉर्न, 2022
 • 103- केएल राहुल विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई WS, 2022
 • 89- मार्कस स्टॉइनिस विरुद्ध मुंबई इंडियन्स, लखनौ, 2023

  follow whatsapp

  ADVERTISEMENT