IPL 2021 Final : मराठमोळा ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी, डु-प्लेसिसचीही आक्रमक इनिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL च्या चौदाव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जने अंतिम सामन्यात KKR च्या बॉलर्सची धुलाई करत १९२ धावांचा डोंगर उभा केला आहे. फाफ डु-प्लेसिस ८६ धावांच्या इनिंगच्या जोरावर चेन्नईने हे आव्हान कोलकात्यासमोर उभं केलं. या इनिंगमध्ये चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आपल्या छोटेखानी इनिंगमध्ये ऑरेंज कॅपचा मान पटकावला आहे.

केकेआरविरुद्धच्या फायनल मॅच आधी ऋतुराजने या हंगामात ६०३ धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या मागे होता. राहुलने या हंगामात ६२७ धावा केल्या आहेत. पण ऋतुराजने या सामन्यात ३२ धावा करत राहुलला मागे टाकले आणि ऑरेंज कॅप स्वत:च्या नावावर केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याचसोबत ऋतुराजने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा तो सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. याआधी पंजाबच्या शॉन मार्शने २५ व्या वर्षात २००८ साली ऑरेंज कॅप मिळवली होती. ऋतुराजने वयाच्या २४ व्या वर्षी हा विक्रम करुन दाखवला.

IPL 2021 Final : CSK ची आश्वासक सुरुवात परंतू ‘हा’ योगायोग ठरु शकतो संघासाठी धोकादायक

ADVERTISEMENT

महत्वाची गोष्ट म्हणजे फाफ-डुप्लेसिसलाही ऋतुराजचने मिळवलेला ऑरेंज कॅपचा मान आपल्या नावावर करण्याची संधी होती. परंतू ५९ बॉलमध्ये ७ फोर आणि ३ सिक्स लगावून डु-प्लेसिस ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दोन रनने मागे पडला.

ADVERTISEMENT

IPL 2021 Final : कोणालाही न जमलेला विक्रम धोनीने आज करुन दाखवला

पहिल्यांदा बॅटींग करताना चेन्नईने चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आऊट झाल्यानंतर CSK च्या स्कोरअरलाईनवर अंकुश लावण्यात कोलकात्याच्या बॉलर्सना यश आलं होतं. परंतू फाफ-डु प्लेसिसने बहारदार फटकेबाजी करत चेन्नईला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. कोलकात्याकडून नारायणने २ तर शिवम मवीने १ विकेट घेतली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT