मराठमोळा माजी क्रिकेटर करणार विराटच्या RCB ला मदत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या आगामी सिझनसाठी बीसीसीआयप्रमाणेच सर्व संघांनीही जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर यांची बॅटींग कन्सलटंट म्हणून नेमणूक केली आहे. RCB ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे.

टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलेले ४८ वर्षीय बांगर २०१४ पासून बॅटींग कोच म्हणून काम पाहत होते. डंकन फ्लेचर, अनिल कुंबळे आणि त्यानंतर रवी शास्त्री या तीन प्रशिक्षकांच्या सोबत संजय बांगर भारतीय संघाचे बॅटींग कोच होते. २०१९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवानंतर टीम इंडियाच्या बॅटींग लाईनअपमध्ये झालेल्या बदलांवरुन बरीच चर्चा रंगली. ज्यानंतर संजय बांगर यांची जागा विक्रम राठोड यांनी घेतली. त्यानंतर संजय बांगल आयपीएलमध्ये कॉमेंट्रीचं काम करत होते. नवीन हंगामात RCB ने बांगर यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्याचं ठरवलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्थानिक क्रिकेटमध्ये रेल्वेचं प्रतिनिधीत्व केलेल्या संजय बांगर यांनी टीम इंडियाकडून १२ टेस्ट आणि १५ वन-डे सामने खेळले आहेत. अष्टपैलू कामगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय बांगर यांच्या नावावर स्थानिक क्रिकेटमध्ये ८ हजार ३४९ रन्स आणि ३०० विकेट्स जमा आहेत. ज्यात १३ सेंच्युरी आणि ४३ हाफ सेंच्युरीचा समावेश आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT