IPL 2022 : टीम सेफर्टला कोरोनाची लागण तरीही DC vs PBKS सामना होणारच

मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर खेळवला जाणार सामना, टॉस जिंकून दिल्लीची पहिल्यांदा बॉलिंग
IPL 2022 : टीम सेफर्टला कोरोनाची लागण तरीही DC vs PBKS सामना होणारच

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब सुपरकिंग्ज सामन्यावरचं गंडातर अखेरीस टळलं आहे. न्यूझीलंडचा खेळाडू टीम सेफर्टला कोरोनाची लागण झाल्यानंतरही आजचा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार खेळवला जाणार आहे. मुंबईच्ये ब्रेबॉन मैदानात झालेला टॉस जिंकत दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतने बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

सामना सुरु होण्याआधी अवघे काही तास टीम सेफर्टचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे दिल्लीच्या गोटात खळबळ उडाली होती.

काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजीओ पॅटट्रीक फराहत यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. यानंतर दिल्लीच्या संघातील आणखी काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआय खबरदारीचा उपाय म्हणून पुणे येथे होणारा दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामना मुंबईत हलवला.

परंतू यानंतरही आणखी एका खेळाडूची अँटीजेन चाचणी पॉजिटीव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे. खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून बीसीसीआयने यंदा आयपीएलचं आयोजन मुंबई आणि पुणे या शहरात केलं होतं. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात दिल्लीचा संघ कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IPL 2022 : टीम सेफर्टला कोरोनाची लागण तरीही DC vs PBKS सामना होणारच
निसटलेला डाव सावरण्यासाठी मुंबईचा शेवटचा प्रयत्न, 'या' बॉलरला संघात संधी मिळण्याचे संकेत?

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in