IPL 2023 Playoffs race : ‘या’ संघांचे प्लेऑफचे गणित बिघडले! असा झाला खेळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

how many teams qualify for ipl playoffs 2023
how many teams qualify for ipl playoffs 2023
social share
google news

IPL 2023 Playoffs Final Race : लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यातील सामन्यानंतर आयपीएल प्लेऑफची समीकरणे बदलली आहेत. या विजयानंतर लखनौचा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौचे 15 गुण आहेत, त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत.

दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनऊ सुपर जायंट्स (LSG), मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (PBKS), राजस्थान रॉयल्स (RR) यांचे समीकरण काय असेल? तेच बघुयात… दिल्ली (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी, हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स (GT) प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला आहे.

MI vs LSG सामन्यामुळे काय झाले?

16 मे रोजी झालेल्या या सामन्यानंतर लखनौ अजूनही टॉप 2 संघांमध्ये पोहोचू शकेल. लखनौला आता उरलेला सामना कोलकात्याशी खेळायचा आहे, अशा परिस्थितीत जर कोलकात्याचा पराभव केला आणि दुसरीकडे चेन्नईचा संघ दिल्लीकडून हरल्यास चेन्नई आणि लखनौचे 17 गुण असतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दुसरीकडे, लखनौ शेवटचा सामना कोलकात्याकडून हरला, तर लखनौला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

हेही वाचा >> कर्नाटक निकालानं CM शिंदेंना इशारा; ‘त्या’ बंडखोर आमदारांचं झालं तरी काय?

लखनौकडून पराभूत झाल्यानंतर मुंबईची अवस्था बिकट झाली आहे. रविवारी मुंबईचा संघ हैदराबादकडून जिंकला तर तिन्ही संघांचे 16 गुण होतील, मात्र ते हरले तर त्यांची प्लेऑफ सामन्यात पोहोचण्याची शक्यता खूपच कमी होईल. जिंकल्यास मुंबई 16 गुणांवर आरसीबी आणि पंजाब किंग्जशी बरोबरी करू शकते.

ADVERTISEMENT

आरसीबी, एलएसजी, सीएसके आणि पीबीकेएस हरले तर मुंबईला गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी असेल. अशा स्थितीत मुंबईला हैदराबादला हरवावे लागेल, अन्यथा त्याची अवस्था बिकट होईल. अशा स्थितीत त्यांचे 14 गुण होतील.

ADVERTISEMENT

पंजाब किंग्ज

पंजाबचा नेट रनरेट खराब आहे, अशा परिस्थितीत त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. जिंकल्यावर त्यांचे गुणतालिकेत 16 गुण होतील. त्यांचा प्लेऑफचा प्रवास 14 गुणांवरच अडकू शकते. त्यांना धर्मशाळेत कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला हरवावे लागेल.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नईचे 13 सामन्यांनंतर 15 गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट (NRR) 0.381 आहे. चेन्नईचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. चेन्नईच्या कोलकात्याविरुद्धच्या पराभवामुळे त्यांचे प्लेऑफचे समीकरण बिघडले आहे. आता त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल. दुसरीकडे दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे CSK आयपीएलमधून बाहेर पडणार आहे. पण, जर निकाल CSK च्या बाजूने आला तर हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

आरसीबीने एकूण 12 सामने खेळले आहेत. त्याचे गुण 12 आहेत आणि NRR 0.166 आहे. आरसीबीला हैदराबाद, गुजरात असे दोन सामने खेळायचे आहेत. आरसीबीने गेल्या सामन्यात राजस्थानला लोळवले होते. त्यामुळे आरसीबी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आला. मात्र, आरसीबीला त्यांचे दोन्ही सामने जिंकावे लागतील.

हेही वाचा >> jaya kishori fees : जया किशोरींची कमाई किती? कार्यक्रमाची फी आहे लाखो रुपये

त्यामुळे आरसीबीचे 16 गुण होतील. त्याचवेळी त्याला इतर संघांच्या निकालावर आणि नेट रनरेट अवलंबून राहावे लागेल. पण आरसीबीचा नेट रनरेट मुंबई आणि पंजाब किंग्जपेक्षा सरस आहे. जर आरसीबीने एक सामना गमावला तर त्याचे गुणतालिकेत 14 गुण असतील. अशा परिस्थितीत, 14 गुणांवर असणार्‍या इतर संघापेक्षा RCB ला NRR च्या बळावर प्राधान्य मिळू शकते.

राजस्थान रॉयल्स

राजस्थानचे 13 सामन्यांत 12 गुण आहेत. ते फार तर 14 गुण मिळवू शकतात. राजस्थानचा नेट रनरेट (NRR) 0.140 आहे. राजस्थान शेवटचा साखळी सामना पंजाब किंग्जसोबत खेळणार आहे. राजस्थानला RCB विरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला, ज्यामुळे त्यांचा NRR 0.633 वरून 0.140 वर गेला. पण, राजस्थान अजूनही पात्र ठरू शकतो. राजस्थानच्या संघाने पंजाबला पराभूत केल्यास आणि इतर संघांचा निकाल राजस्थाननुसार राहील.

कोलकाता नाईट रायडर्स

नितीश राणाच्या कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. त्याचे 12 गुण आहेत. तर नेट रनरेट (NRR) उणे 0.256 आहे. KKR चा शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध आहे, ज्यांनी मुंबईचा पराभव केला आहे. RR, RCB आणि MI त्यांचे उर्वरित सामने हरल्यास KKR साठी दिलासादायक स्थिती निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत KKR, PBKS आणि MI चे 14 गुण असतील, या तीन संघांचे NRR देखील नकारात्मक आहेत.

हेही वाचा >> Rahul Narvekar : कट्टर शिवसैनिक राहिलेल्या नार्वेकरांनी किती पक्ष बदलले?

आता उदाहरण द्यायचे झाल्यास जर कोलकाताने 180 धावा केल्या आणि 20 धावांनी विजय मिळवला तर त्यामुळे नेट रनरेट सुधारून -0.161 होईल. जे मुंबईच्या नेट रनरेटच्या बरोबर असेल; त्यानंतर कोलकातासाठी परिस्थिती अनुकूल होऊ शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT