Rahul Narvekar : कट्टर शिवसैनिक राहिलेल्या नार्वेकरांनी किती पक्ष बदलले?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

know everything about BJP MLA Rahul Narvekar political journey
know everything about BJP MLA Rahul Narvekar political journey
social share
google news

“आजचं मी बघितलं की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडनमधून मुलाखत देताहेत की, शिवसेनेचे उर्वरित 16 आमदार कसे अपात्र होतील. याविषयी तिकडे प्रवचनं करत आहेत. हे जे नार्वेकर आहेत, त्यांच्या पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. पक्षांतरावर उत्तेजन देणं, हा त्यांचा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही. आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन करायला सांगतो आहोत. त्यांना निर्णय लवकर द्यावा लागेल. का देणार नाहीत? त्यांचा छंद आहे पक्षांतर आणि व्यवसायही आहे. तरीही हा निर्णय त्यांना लवकर द्यावा लागेल”, हे विधान आहे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांचे. राऊत नार्वेकरांवर सडकून टीका करतायेत. त्याचबरोबर नार्वेकरांचा पक्ष बदलणं हा छंद असल्याचं देखील राऊत म्हणाले. आता राऊत नेमकं असं का म्हणाले? आणि नार्वेकरांचा पक्षांतराचा कसा इतिहास आहे तेच पाहुयात…

वकील ते शिवसेनेचे प्रवक्ते

राहुल नार्वेकर हे सध्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांनी 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकले देखील. 45 वर्षीय नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक संस्थांसाठी वकील म्हणून काम पाहिलं आहे.

हेही वाचा >> Nagpur : ‘पैसे द्या, शिंदे सरकारमध्ये मंत्री बनवतो’, भाजप आमदारांकडे मागितले कोट्यवधी

इतकंच नाही तर शिवसेनेचे वकील म्हणून देखील त्यांची ओळख होती. शिवसेनेच्या संदर्भातील याचिकांवर शिवसेनेची बाजू मांडण्याचे काम राहुल नार्वेकर करत असत. आदित्य ठाकरेंचे कायद्यातील गुरु म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. सध्या जरी नार्वेकर भाजपमध्ये असले तरी त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसैनिक म्हणून झाली होती. एकेकाळी ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील होते. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या जवळचे म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश… लोकसभा निवडणूक लढवली

2014 साली शिवसेनेने त्यांना लोकसभेचं तिकिट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी मावळ मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर राष्ट्रवादीने नार्वेकरांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं.

हेही वाचा >> Karnataka Election: मातब्बर मंत्र्याला लोळवून अनाथ पोरगा झाला आमदार!

पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत कमळ हाती घेतलं. नार्वेकरांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर कुलाब्यातून निवडणूक लढवली. भाजपने त्यांना मीडिया इंचार्ज पदाची देखील जबाबदारी दिली होती.

ADVERTISEMENT

रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई

राष्ट्रवादीचे रामराजे नाईक – निंबाळकर हे राहुल नार्वेकरांचे सासरे आहेत. सुरूवातीलच्या काळामध्ये नार्वेकर विधानसभेचे सभापती असताना रामराजे नाईक – निंबाळकर हे विधान परिषदेचे अध्यक्ष होते. नार्वेकरांनी इतक्या वेळा पक्षांतर केल्याच्या मुद्द्यावरच आता राऊतांनी बोट ठेवलं आहे. त्यामुळे आता या टीकेला नार्वेकर काय उत्तर देतात, हे पाहावं लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT