Karnataka Election: मातब्बर मंत्र्याला लोळवून अनाथ पोरगा झाला आमदार! - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Karnataka Election: मातब्बर मंत्र्याला लोळवून अनाथ पोरगा झाला आमदार!
बातम्या राजकीय आखाडा

Karnataka Election: मातब्बर मंत्र्याला लोळवून अनाथ पोरगा झाला आमदार!

in karnataka election pradeep eshwar created history by defeating bjp health minister k sudhakar

Pradeep Eshwar: बंगळुरू: हातात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, शेकडो कार्यकर्तांचा गराडा आणि घोषणाबाजी. अशी होती कर्नाटकच्या एका तरुण आमदाराची विजयी रॅली. एकीकडे कर्नाटकात कोण मुख्यमंत्री होणार याबाबतची चर्चा सुरु असताना दुसरीकडे कर्नाटकच्या सर्वात तरुण आमदाराची चर्चा होऊ लागली आहे. या तरुण आमदाराने थेट आरोग्यमंत्र्याचाच पराभव केला आहे. कर्नाटकातला हा आमदार नेमका कोण आणि त्याने थेट आरोग्यमंत्र्यालाच कसं हरवलं या सगळ्याची इंटरेस्टिंग गोष्ट आपण सविस्तरपणे पाहूयात. (in karnataka election pradeep eshwar created history by defeating bjp health minister k sudhakar)

आरोग्यमंत्र्याचा नेमका कसा केला पराभव?

ज्या आमदाराने भाजपच्या आरोग्यमंत्र्याचा दणदणीत पराभव केला आहे त्याचं नाव आहे प्रदीप इश्वर. प्रदीपने कर्नाटकचे दिग्गज नेता आणि आरोग्यमंत्री के. सुधाकर यांचा तब्बल 10 हजार 642 मतांनी पराभव केला आहे. प्रदीपचा आमदार होण्यापर्यंतचा प्रवास तसा सोपा नव्हता. प्रदीप हा अनाथ आहे. तो सर्वात आधी चर्चेत आला तो 2016 साली कर्नाटकमध्ये झालेल्या एका आंदोलनामुळे. बंगळुरूच्या देवनहल्ली मध्ये विजीपुरा या भागाला तालुका घोषित करण्याची मागणी आंदोलनांकडून करण्यात येत होती.

या आंदोलनामुळे तालुका तर मिळाला नाही पण प्रदीप मात्र फेमस झाला. या आंदोलनानंतर प्रदीपने के. सुधाकर यांच्या विरोधात युट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा >> कर्नाटक निकालानं CM शिंदेंना इशारा; ‘त्या’ बंडखोर आमदारांचं झालं तरी काय?

2018 मध्ये पोलिसांच्या लाठी हल्ल्यात एका काँग्रेसी कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या विरोधात प्रदीपने आवाज उठवला होता. ज्यामध्ये त्याला अटक देखील करण्यात आली होती. या सगळ्या घटनेमुळे प्रदीपच्या प्रसिद्धीत वाढच झाली. सुधाकर यांना हरवू शकेल असा उमेदवार काँग्रेसला हवा होता. प्रदीपच्या रुपाने त्यांना असा उमेदवार मिळाला. प्रदीपने पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील.

प्रदीपची पार्श्वभूमी नेमकी कशी आहे ते आपण समजावून घेऊयात. प्रदीप परिश्रम एजुकेशन प्रायव्हेट लिमिटेड नावाचा कोचिंग क्लास चालवतो. जे मेडिकल आणि इतर स्पर्धा परिक्षांबाबत कोचिंग देतात. प्रदीपची पत्नी देखील या क्लासमध्ये शिक्षिका आहे. निवडणूक प्रचारातली त्याची आक्रमक शैली मतदारांना भावली. त्याचं भाषण देखील चांगलंच व्हायरल झालं होतं.

काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार प्रदीप ईश्वर

 

निकालानंतर प्रतिक्रिया देताना प्रदीप म्हणाला, ‘काँग्रेस पक्षाला दक्षिण भारतात, विशेषतः कर्नाटकात मोठा जनाधार आहे. माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातील अनाथ मुलाला काँग्रेसने आमदारकीचं तिकीट दिलं. कुठलेही पैसे न खर्च करता मी जिंकूनह आलो. यावरुनच आजही लोकशाही जिवंत असल्याचं दिसून येते. मी काँग्रेस पक्षाला धन्यावाद देतो.’

हे ही वाचा >> Karnatka Election : राहुल गांधी ठरले ‘हिरो’, भारत जोडो’ची जादू चालली!

प्रदीपच्या विजयानंतर काँग्रेसकडून मोठा जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी जल्लोष साजरा करताना हातात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हातात घेऊन आनंद साजरा केला होता. यावेळी बाबासाहेबांमुळेच एक अनाथ मुलगा आमदार झाल्याचं प्रदीपने म्हंटलं आहे.

सध्या प्रदीपची आणि त्याच्या विजयाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट! Shruti Marathe च्या घायाळ करणाऱ्या अदांवर, चाहते फिदा! साधं राहणीमान असणाऱ्या Ratan Tata कडे आहेत ‘या’ खास वस्तूचं कलेक्शन Swara Bhaskar ने दिली Good News! शेअर केले खास Photo