Maharashtra Weather : सूर्यदेव कोपणार, 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर इथे वादळाचं संकट
Maharashtra Weather : राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. 21 मे रोजी काही जिल्ह्यांना पावसाचा तर काही भागांत तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात हवामानात सातत्याने बदल
21 मे रोजी कशी असेल परिस्थिती?
Maharashtra Weather : राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. 21 मे रोजी काही जिल्ह्यांना पावसाचा तर काही भागांत तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशात जाणून घेऊयात एकूण हवामान विभागाचा अंदज.
हे ही वाचा : सांगलीत 69 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून, अल्पवयीन तिघांचा समावेश
कोकण
कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. याच विभागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीजवळील भागात हवामान दमट राहणार असून उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि पुण्यात दुपारनंतर काही प्रमाणात वातावरणात बदल जाणवणार आहे. तसेच काही भागांमध्य़े देखील मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा अधिक तडाखा राहणार आहे, तसेच काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. याच विभागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे.









