नवरा जबरदस्तीने पॉर्न दाखवायचा अन् अनैसर्गिक अत्याचार करायचा, शेवटी महिलेने काय केलं?

मुंबई तक

ahmedabad crime news : अहमदाबादमध्ये विवाहित महिलेने पती, सासू आणि दीराविरोधात गंभीर छळाचे आरोप करत महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अश्लील व्हिडिओ दाखवून अनैसर्गिक संबंधांसाठी दबाव, मारहाण आणि गर्भपातासाठी सक्ती केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

ADVERTISEMENT

ahmedabad crime news
ahmedabad crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवरा जबरदस्तीने पॉर्न दाखवायचा अन्

point

अनैसर्गिक अत्याचार करायचा, शेवटी महिलेने काय केलं?

ahmedabad crime news : अहमदाबादच्या शाहीबाग परिसरातील एका विवाहित महिलेने सासरी झालेल्या कथित छळाबाबत गंभीर आरोप करत महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. 

हेही वाचा : नवऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर अनैसर्गिक कृत्य केलं अन्..

महिलेच्या आरोपांनुसार, तिचा पती तिला जबरदस्तीने अश्लील व्हिडीओ दाखवत असे. त्यानंतर त्याच पद्धतीने अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. याशिवाय विरोध केल्यास मारहाण केली जात असल्याचाही आरोप तिने केला आहे. गर्भधारणेदरम्यानही पतीने तिला लाथ मारून गर्भपात करण्यासाठी दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर महिला पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा मांडली असून, पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा : मुंबईची खबर : कर्मचाऱ्यांच्या संपानतर 'बेस्ट'ने घेतला मोठा निर्णय

हे वाचलं का?