सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना फटकारलं, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला (UBT) तीव्र शब्दांत फटकारले असून, न्यायालयाबाहेर माध्यमांसमोर बेजबाबदार विधाने न करण्याची तंबी दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना फटकारलं
सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज (दि.15) अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान CJI Surya Kant यांनी ठाकरे गटाचे (UBT) वकील देवदत्त कामत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. ठाकरे गटाच्या वकिलांनी जेव्हा सरन्यायाधीशांना त्यांच्या सोयीनुसार या प्रकरणाची तारीख लवकरात लवकर निश्चित करण्याची विनंती केली, तेव्हा न्यायालयाने संतप्त भावना व्यक्त केल्या. न्यायालयात एकीकडे तारखेची मागणी करायची आणि दुसरीकडे बाहेर जाऊन न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे, अशी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. ठाकरे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन न्यायालयाने थेट आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा : Astrology : सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश, 'या' राशींवर संकटाची टांगती तलवार, 12 राशींचं जाणून घ्या भविष्य
सरन्यायाधीशांनी ठाकरे गटाच्या वकिलांना खडसावताना सांगितले की, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांसमोर जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नसल्याची बेजबाबदार विधाने करण्यापासून रोखा. तुम्ही येथे न्यायालयात तारखेची मागणी करता आणि बाहेर जाऊन न्यायालय काम करत नसल्याचे भासवता. यापुढे न्यायालयाच्या कामकाजाबाबत शब्द वापरताना काळजी घ्या, कारण मी अशा प्रकारचे वर्तन स्वीकारणारा व्यक्ती नाही, अशा कडक शब्दांत सरन्यायाधीशांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
हेही वाचा : Astrology : सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश, 'या' राशींवर संकटाची टांगती तलवार, 12 राशींचं जाणून घ्या भविष्य









