बंद खोली आणि 31 दिवस, अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; नेमकी घटना काय?
एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील या मुलीचे अपहरण करुन तिला बेंगलोरमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी 31 दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आले. इतकी भयानक घटना उघडकीस यायला इतके महिने का लागले?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बंद खोली आणि 31 दिवस
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नेमकी घटना काय?
Crime News : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमधील या मुलीचे अपहरण करुन तिला बेंगलोरमध्ये नेण्यात आले. त्याठिकाणी नेऊन तब्बल महिनाभर म्हणजे 31 दिवस तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी 13 मे रोजी आणि तीन आरोपी 14 मे रोजी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अद्याप एक आरोपी फरार आहे. 1 मार्च 2026 रोजी मुलीची पोलिसांनी सुटका केली होती. मात्र तब्बल दोन महिन्यांनी पीडित मुलीने कुटुंबियांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली.
'जेव्हा-जेव्हा आई कामावर जायची..'
पीडित मुलीने सांगितले की, 'ती आणि तिची आई एका भाड्याच्या घरात राहतात. तिची आई एके ठिकाणी जॉब करुन घर सांभाळते. माझं शिक्षणही तिच्याच कमाईवर होतं. जेव्हा-जेव्हा आई कामावर जायची आणि मी एकटीच घरी असायची तेव्हा आमची घरमालकीन मला खोलीत बंद करुन ठेवायची. गुड्डी राठौर असं या घरमालकिनीचं नाव आहे. यानंतर तिचा मुलगा मनोज आणि पुतण्या योगेश दोघंजण यायचे आणि माझ्यावर जबरदस्ती करायचे.'
हे ही वाचा : शाळकरी मुलाच्या रफ वहीने उलगडले हत्येचे गुपित, रील स्टारचे दोन प्रियकर अन् मोठं कांड
तब्बल 31 दिवस..
31 जानेवारी 2026 रोजी जेव्हा पीडिता ट्यूशनसाठी घराबाहेर पडली तेव्हा तिचे काहीजणांनी अपहरण केले. यामध्ये बुलबुल राठौर, योगेश, राजेश आणि वकीला नावाच्या व्यक्तींचा समावेश होता. तिचे अपहरण करुन तिला बेंगलोरला नेण्यात आले. त्याठिकाणी योगेश, राजेश आणि वकीला यांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याठिकाणी तिला तब्बल महिनाभर म्हणजे 31 दिवस डांबून ठेवण्यात आले होते.
हे ही वाचा : 'आई व्हायचं नव्हतं..' न्यायाधीशाच्या सुनेचा मृत्यू; हत्या की आत्महत्या?
दोन महिने का गप्प राहिली?
यानंतर 1 मार्च 2026 रोजी पोलिसांनी तिची सुटका केली. मात्र यावेळी पीडितेने स्वेच्छेनेच आपण पळून आल्याचे सांगितले. यामागचं कारण म्हणजे आरोपींची भीती. आरोपींनी तिला आणि तिच्या आईला संपवण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती आपलं दु:ख, झालेला त्रास आतल्या आत सहन करत होती. दोन महिने तिने हा त्रास सहन केला. त्यानंतर स्वत:च्या आणि आईच्या सुरक्षिततेची खात्री झाल्यावर तिने नातेवाईकांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. नातेवाईकांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तातडीने तपासाची चक्रे फिरवली.









