Nagpur : 'पैसे द्या, शिंदे सरकारमध्ये मंत्री बनवतो', भाजप आमदारांकडे मागितले कोट्यवधी - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Nagpur : ‘पैसे द्या, शिंदे सरकारमध्ये मंत्री बनवतो’, भाजप आमदारांकडे मागितले कोट्यवधी
बातम्या शहर-खबरबात

Nagpur : ‘पैसे द्या, शिंदे सरकारमध्ये मंत्री बनवतो’, भाजप आमदारांकडे मागितले कोट्यवधी

Nagpur Crime news : police arrested A man who demanded money To BJP MLA Vikas Kumbhare. he was saying that he will make you a minister in maharashtra cm shinde's cabinet.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा पीए आहे असं सांगून एका भामट्याने महाराष्ट्रातील भाजप आमदारांनाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला. नड्डा यांचा पीए असल्याचं सांगून शिंदे सरकारमध्ये मंत्री करतो. कर्नाटकातील सरकार स्थापनेसाठी पैसे तयार ठेवा, असं सांगत या भामट्याने भाजपच्या चार कोट्यवधी रुपयांची मागणी केली. या घटनेनं नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपूर पोलिसांनी नीरज सिंह राठोड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी राजस्थानातील अहमदाबाद येथील रहिवाशी आहे.

भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा डाव

नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमधील मोरबीचा रहिवाशी असलेल्या नीरज सिंह राठोड यांने महाराष्ट्र, नागालँड आणि गोव्यातील आमदारांना मंत्री करण्याचं आमिष दाखवून पैसे लाटण्याचा डाव रचला होता. आरोपींने भाजप आमदारांना पैसे तयार ठेवण्यास सांगितलं होतं.

नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार विकास कुंभारे यांनी नीरज राठोड याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

हेही वाचा >> Mahesh Landge: पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची आताच मागणी का होतेय?

विकास कुंभारे यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, नीरज सिंह राठोड याने माझ्याशी संपर्क केला. मंत्रीपदाचं आमिष दाखवलं. कुंभारे यांनी आरोपीला पैसे दिले नाही, मात्र इतर काही आमदारांनी पैसे दिल्याची माहिती समोर आली आहे.

नागपूर पोलिसांनी भादंवि कलम 420 नुसार फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नीरज सिंह याला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

नीरज सिंहने विकास कुंभारेंना काय दिली ऑफर?

आपण जेपी नड्डा यांचा पीए असून, तुम्हाला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री करतो, असं त्याने सांगितलं होतं. जेपी नड्डा यांनी तुम्हाला कोणतं खातं हवंय असं विचारलं आहे. तुम्हाला नगरविकास मंत्री केलेलं चालेल का? असं सांगत कर्नाटकात तोडून मोडून भाजपचं सरकार स्थापन करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला तयार राहावं लागेल, असं नड्डा यांनी सांगितलेलं असल्याचं तो म्हणाला होता.

पंढरपूरला असताना एक कॉल आला… आमदार प्रवीण आर्लेकरांनी काय सांगितलं?

“मी शिर्डीला आणि पंढरपूरला फिरायला गेलो होतो. शिर्डीवरून पंढरपूरला आलो असता, एका अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. समोरच्या व्यक्तीने मला मंत्रिपदाची ऑफर दिली. पैसे दिले पाहिजे. यासाठी तुम्ही पैसे घेऊन दिल्लीला आलं पाहिजे”, अशी माहिती गोव्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.

हेही वाचा >> Karnataka Election: मातब्बर मंत्र्याला लोळवून अनाथ पोरगा झाला आमदार!

पुढे ते म्हणाले की, “अशी मला ऑफर दिली, परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केलं. याआधी असाच एक कॉल मला निवडणुकीच्या आधी आला होता. गोवा भाजपकडून तुम्हाला तिकीट मिळवून देतो, पैसे द्या अशी मागणी करण्यात आली होती. मंत्रिपदाबाबत जो कॉल आला त्या संदर्भात गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना बोललो. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सतर्क रहा, असे सूचित केले होते”, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितलं.

ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरची बायको अभिनेत्रींपेक्षाही ग्लॅमरस WTC फायनलपूर्वी स्टार क्रिकेटरची निवृत्तीची घोषणा ‘या’ तरुणीला पाहून तुम्ही व्हाल थक्क, म्हणाल ही तर… चाळीशी ओलांडून देखील अभिनेत्री ‘सिंगल’,कोण आहेत ‘या’ Actress? ‘या’ अभिनेत्रीने खरेदी केलं तब्बल 190 कोटींचं घर? Train Accident: सर्वात भयंकर ट्रेन अपघात, फोटो पाहून आपणही हादरून जाल! Isha Ambani चा रॉयल बंगला! प्रत्येक कोपरा हिऱ्यासारखा चकाकणारा.. MS Dhoni ने चाहत्यांची ‘ही’ इच्छा केली पूर्ण! Viral Video पाहिलात का? निसा देवगनसोबत ‘हा’ तरूण आहे तरी कोण?, Photo Viral Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव! Anemia : शरीरात असेल रक्ताची कमतरता.. तर खा फक्त ‘हे’ फळ! ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले ‘मायबाप’ Malaika Arora च्या प्रेग्नेंसीवरून अर्जुन भडकला! कारण.. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे ‘गागाभट्ट’ कोण? IND-AUS : WTC फायनलमध्ये ड्रॉ झाली तर, विजेता कोण ठरणार? शिवराज्याभिषेक म्हणजे काय? shiv Rajyabhishek 2023 : 350 वर्षापूर्वी किल्ले रायगडावर घडला होता इतिहास Sonakshi Sinha : …अन् सलमान खानने तिचं नशीबच बदलून टाकलं आश्चर्यकारक! चक्क 3 फुटांची गाय 30 किलो वजन घटवलं, अन् अभिनेत्रीला मिळाला बॉलिवूडमध्ये ब्रेक