Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे नवा महाराष्ट्र केसरी
(Shivraj Rakshe Maharashtra Kesari 2023) पुणे : प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चीतपट करुन राक्षेवाडीच्या शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. गतवेळी खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या शिवराजने यंदा मात्र महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न साकार केलं. शिवराजला आता महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा, रोख ५ लाखांचे बक्षीस आणि थार गाडी मिळणार आहे. […]
ADVERTISEMENT

(Shivraj Rakshe Maharashtra Kesari 2023)
पुणे : प्रतिस्पर्धी महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात चीतपट करुन राक्षेवाडीच्या शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली आहे. गतवेळी खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या शिवराजने यंदा मात्र महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न साकार केलं. शिवराजला आता महाराष्ट्र केसरीची मानाची चांदीची गदा, रोख ५ लाखांचे बक्षीस आणि थार गाडी मिळणार आहे. तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत शनिवार (१४ जानेवारी) रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थिती ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगली. या स्पर्धेला अखिल भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार रामदास तडस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रिडामंत्री गिरीश महाजन अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.