ICC Cricket : क्रिकेट विश्व हादरलं, मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं कोण? - Mumbai Tak - match fixing icc action players on corruption in cricket charges before world cup - MumbaiTAK
बातम्या स्पोर्ट्स

ICC Cricket : क्रिकेट विश्व हादरलं, मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं कोण?

क्रिकेट विश्व आता पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगमुळे हादरुन गेले आहे. त्यामुळे आयसीसीकडून आता मॅचफिक्सिंगमध्ये आलेल्या खेळाडूंवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावेळी फक्त खेळाडूच मॅच फिक्सिंगमध्ये अडकले आहेत असं नाही तर टीम मालकही त्यामध्ये सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
match fixing icc action players on corruption in cricket charges before world cup

Match Fixing Cricket  : जगभरातील क्रिकेटप्रेमी आता मोठ्या स्पर्धेची वाट बघत आहेत. त्यातच आता एक दिवसीय विश्वचषकाकडून (world cup) चाहत्यांच्या मोठ मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र त्याआधीच क्रिकेट विश्वात मोठी खळबळ माजली आहे. कारणही तसच आहे. आयसीसीने (ICC) एका लीगमध्ये मॅच फिक्सिंग (Match fixing) झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांवर आता बंदी घालण्यात आली आहे. आयसीसीकडून आता एकूण 8 जणांवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्व हादरलं आहे. (match fixing icc action players on corruption in cricket charges before world cup)

खेळाडू आणि टीम मालकही

बांगलादेशचा माजी अष्टपैलू खेळाडू नासिर हुसैनसह त्यामध्ये एकूण 8 जणांच्या नावाचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये क्रिकेटपटू, सपोर्ट स्टाफ आणि टीमच्या मालकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. आयसीसीने नासिर हुसेनवर कलम 2.4.3, कलम 2.4.4 आणि कलम 2.4.6 लावण्यात आले आहे. या अंतर्गत आरोप करण्यात आले असून क्रिकेट स्पर्धा खेळताना काही भेटवस्तू मिळाल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच याबाबतची माहिती लपवण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> Hardeep Singh Nijjar : कोण होता खलिस्तानी दहशतवादी? ज्याच्या हत्येने भारत-कॅनडा संबंध झाले खराब

ईसीबीला सहकार्य नाही

नासिर हुसेनने बांगलादेशकडून 19 कसोटी, 65 एकदिवसीय सामने आणि 31 टी-20 सामने खेळले आहेत. मात्र 2017 पासून त्याने कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळ केला नाही. मात्र तो बांगलादेश प्रीमियर लीग आणि इतर काही लीगमध्ये सक्रिय असल्याचे मात्र सांगण्यात आले आहे.अबुधाबी टी-10 लीगचे दोन टीम मालक कृष्ण कुमार चौधरी आणि पराग संघवी यांच्यावरही गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. या दोघांवर ईसीबीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच संघाच्या हिटिंग कोच, टीम मॅनेजर, सहाय्यक प्रशिक्षक आणि इतर दोन देशांतर्गत खेळाडूंवरही याबाबतचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

हे ही वाचा >> Michchami Dukkadam : PM मोदींनी नव्या संसदेत वापरलेल्या ‘मिच्छामी दुक्कडम’ शब्दाचा अर्थ काय?

स्पष्टीकरण द्या

आयसीसीकडून ज्यांच्या आरोप केले आहेत, त्या सर्वांना निलंबित केले असून त्यांना आता स्पष्टीकरण देण्यासाठी काही दिवसांची मुदतही देण्यात आली आहे. जगभरात खेळल्या जाणार्‍या अनेक प्रकारच्या क्रिकेटवर आयसीसीकडून नजर ठेवण्यात येते. तर आयसीसीच्या ईसीबीकडूनही वेळोवेळी खेळाडू आणि क्रिकेट मंडळांच्या सहकार्याने वेगवेगळ्या प्रकारची चौकशी करत असते आणि त्यातूनच हे सर्व उघड झाल्याचे सांगण्यात आले आहे.

ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो!