Michchami Dukkadam : PM मोदींनी नव्या संसदेत वापरलेल्या 'मिच्छामी दुक्कडम' शब्दाचा अर्थ काय? - Mumbai Tak - pm narendra modi says micchami dukkadam new parliament speech what was her meaning - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Michchami Dukkadam : PM मोदींनी नव्या संसदेत वापरलेल्या ‘मिच्छामी दुक्कडम’ शब्दाचा अर्थ काय?

नव्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. या भाषणा दरम्यान पंतप्रधान मोदी यानी 'मिच्छामी दुक्कडम' या शब्दाचा वापर केला. या शब्दाचा अर्थ आहे, क्षमा मागणे.
pm modi says micchami dukkadam new parliament speech what was her meaning

गणेश चतुर्थी आणि समवतसरीच्या शुभमहूर्तावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळ्या खासदारांनी संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश केला. या प्रवेशानंतर नव्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. या भाषणा दरम्यान पंतप्रधान मोदी यानी ‘मिच्छामी दुक्कडम’ या शब्दाचा वापर केला. या शब्दाचा अर्थ आहे, क्षमा मागणे. त्यामुळे पंतप्रधानांनी नेमकी कोणाची माफी मागितली आणि ‘मिच्छामी दुक्कडम’ या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? हे जाणून घेऊयात. (pm narendra modi says micchami dukkadam new parliament speech what was her meaning)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनात भाषणाच्या सुरुवातीलाच माफी मागितली आहे. आपण सर्वांची नम्रपणे माफी मागतो, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व संसद सदस्यांना आणि देशवासियांना ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हटले. तसेच आता आपण भूतकाळातील सर्व कटुता विसरून पुढे चाललं पाहिजे. नव्या उत्साहाने कामाला सुरुवात केली पाहिजे, असे म्हणत संसद सदस्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा  : ‘वाचाळवीरांना…’, बोलले पडळकर, पण रोहित पवार संतापले देवेंद्र फडणवीसांवर

‘मिच्छामी दुक्कडम’ का म्हणाले?

19 सप्टेंबर हा नवीन संसद भवनात सभागृहाच्या कामकाजाचा पहिला दिवस होता. या दिवशी गणेश चतुर्थीसोबतच, जैन धर्माचा संवत्सरी सणही आहे. या दिवशी एकमेकांना ‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणण्याची परंपरा आहे. याचा अर्थ आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागणे असा होतो.

“माझ्या विचारातून, कृतीतून किंवा शब्दांतून जाणूनबुजून किंवा नकळत कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागण्याचा हा सण आहे. माझ्याकडूनही, पूर्ण नम्रतेने, मनापासून, ‘मिच्छामी दुक्कडम’ तुम्हा सर्वांना, सर्व खासदारांना आणि सर्व देशवासियांना. आज, जेव्हा आपण नवीन सुरुवात करत आहोत, तेव्हा आपल्याला भूतकाळातील प्रत्येक कटुता विसरून पुढे जावे लागेल, असे मोदी म्हणाले आहेत.

‘मिच्छामी दुक्कडम’ म्हणजे काय?

‘मिच्छामी दुक्कडम’ हा प्राचीन भारतातील प्राकृत भाषेतील शब्द आहे. यामध्ये ‘मिछमी’ म्हणजे ‘क्षमा मागणे’ आणि ‘दुक्कडम’ म्हणजे ‘वाईट कृत्ये आणि चुका’. याचा अर्थ, जाणूनबुजून किंवा नकळत काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. जैन परंपरेत या शब्दाचा वापर होतो.

हे ही वाचा  : NCP : प्रफुल्ल पटेल शरद पवार आले एकत्र; फोटो बघून उंचावल्या भुवया

डेंग्यूच्या रूग्णांनी ‘या’ गोष्टी खाणं टाळाच! नाहीतर… Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट?