भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल - PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती

'ICC ही सध्याच्या घडीला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, PCB ला मिळणारा ५० टक्के निधी ICC कडून'
भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल - PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातले क्रिकेट सामने सध्या बंद आहेत. आयसीसीच्या स्पर्धा वगळता दोन्ही संघ सध्या सामने खेळत नाहीत. आगामी टी-२० विश्वचषकात हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर येतील. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्या वक्तव्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलंय.

आयसीसीला मिळणारं ९० टक्के उत्पन्न हे भारताकडून येतं, त्यामुळे उद्या जर भारताने ठरवलं तर पाकिस्तानमधलं क्रिकेट हे क्षणार्धात कोसळू शकतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या Inter-Provincial affairs समितीसमोर बोलत असताना राजा यांनी हे वक्तव्य केलं आहे. "त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आता आयसीसीकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून न राहता स्थानिक मार्केटमधून निधीसाठी तयारी करावी लागणार आहे."

ICC सध्या आशियाई आणि पाश्चिमात्य अशा दोन गटांमध्ये विभागली गेली आहे. आयसीसीला मिळणारा ९० टक्के निधी हा भारताकडून येतो. हे खूप भीतीदायक आहे. कारण PCB ला मिळणारा ५० टक्के निधी हा आयसीसीकडून येतो. त्यामुळे एका अर्थाने पहायला गेलं तर भारतीय व्यापारी पाकिस्तानमधलं क्रिकेट चालवत आहेत. उद्या जर भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तानला फंडींग जाऊ देणार नाही असा निर्णय घेतला तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोसळू शकेल.

भारताने ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट क्षणार्धात कोसळेल - PCB प्रमुख रमीझ राजांनी व्यक्त केली भीती
T-20 World Cup : ७० टक्के प्रेक्षकांना युएईत सामना पाहण्याची परवानगी

सध्याच्या घडीला आयसीसी ही एका प्रकारे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी झाली असून न्यूझीलंड आणि इंग्लंड दौरा रद्द झाल्यामुळे आपल्याला झालेलं नुकसान पुन्हा होऊ द्यायचं नसेल तर आपण आपला आवाज अधिक जोरदार पद्धतीने आयसीसीपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केलेलं कृत्य हे आक्षेप घेण्याजोगच होतं. कारण त्यांना नेमकी काय माहिती मिळाली होती ती त्यांनी आम्हाला दिलीच नाही असंही रमीझ राजा म्हणाले. त्यामुळे या वक्तव्याचे आता काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in