भारतानं पाकिस्तानला हरवल्यानंतर ‘ओ भाई मुझे मारो’ म्हणणाऱ्या साकिबला अश्रू अनावर; अँब्युलन्सही मागवली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आशिया चषकाच्या सुपरहिट सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. दुबईत रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत लढत पाहायला मिळाली, मात्र भारताने सामना जिंकला. सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, यापैकी एक खास प्रतिक्रिया आहे ती आपल्या व्हिडिओंमुळे चर्चेत असलेल्या मोमीन साकिबची.

पाकिस्तानी खेळाडूंचे विकेट पडताच मोमीन म्हणाला माझ्यासाठी अँब्युलन्स मागवा

इंस्टाग्रामवर मोमीन साकिबने सामन्याच्या दिवशी अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो अप्रतिम प्रतिक्रिया देत आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची विकेट पडली तेव्हा मोमीन येथे अँब्युलन्स शोधताना दिसला. व्हिडिओमध्ये तो रडत म्हणत आहे की, ‘आता काय करावे बाबरही बाहेर आहे, रिजवानही गेला आहे. माझ्यासाठी अँब्युलन्स घेऊन या. हा व्हिडीओ लाखो नेटकऱ्यांनी पहिला असून. त्याच्या या विनोदी व्हिडीओजना सव्वा लाखापेक्षा जास्त युजर्सनी लाईक देखील केले आहे.

मोमीन साकिबचा रडताना व्हीडिओ व्हायरल

याशिवाय एका व्हिडिओमध्ये मोमीन साकिब रडताना दिसत आहे, ज्यामध्ये तो टिश्यूने अश्रू पुसत आहे. येथे मोमीन सामना संपल्यानंतर स्टेडियममध्ये बसून सतत आपले अश्रू पुसत आहे. हा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोहलीकडे केली ही अपेक्षा व्यक्त

सामना संपल्यानंतर मोमीन साकिब भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि भारताचा सामना विजेता हार्दिक पंड्या यांची भेट घेतली. विराट कोहलीशी संवाद साधताना मोमीन साकिब म्हणाला की, आशा आहे की अंतिम सामन्यात दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येतील. हार्दिक पांड्याला देखील साकिबने विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

मोमीन साकिब सोशल मीडियावर एक मोठा सुपरस्टार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2019 मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते, त्यावेळी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यात त्याने प्रतिक्रिया दिली होती की, ‘ओ भाई, मारो मुझे’. तेव्हापासून मोमीन साकिब सोशल मीडियावर लोकांचा आवडता राहिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT