Commonwealth Games 2022: बॉक्सिंगमध्ये भारताची सहा पदकं निश्चित, कसा आहे आतापर्यंतचा प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games 2022) भारतीय बॉक्सर्सची चमकदार कामगिरी सुरूच आहे. अमितने गुरुवारी पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट प्रकारात स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा 5-0 असा पराभव केला. दुसरीकडे, जास्मिन लॅम्बोरियाने 60 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनचा 4-1 असा पराभव केला. त्यानंतर सागरने सेशेल्सच्या बॉक्सरचा 5-0 असा पराभव करून आणखी एक पदक निश्चित केले.

पहिल्या फेरीत अमित पंघलविरुद्ध पंचांनी दिलेला 9-10 असा निकाल वगळता या भारतीय बॉक्सरने प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले आहे. 26 वर्षीय अमितने यापूर्वी राऊंड-16 मध्येही 5-0 असा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यापूर्वी, विश्वविजेते निखत झरीन, नीतू घनघास आणि हुसामुद्दीन मोहम्मद यांनीही उपांत्य फेरी गाठून पदक जिंकण्याची खात्री दिली आहे.

भारताच्या आतापर्यंत पटकावली अनेक पदकं

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये, भारताने आतापर्यंत 18 पदके जिंकली आहेत, ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये दहा पदके आली आहेत. त्याचबरोबर ज्युदोमध्ये भारताला तीन तर लॉन बॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि स्क्वॉशमध्ये भारताला एक पदक मिळाले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मधील भारताचे पदक विजेते

1. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)

2. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 61 किलो)

ADVERTISEMENT

3. मीराबाई चानू- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 49 किलो)

ADVERTISEMENT

4. बिंदियाराणी देवी- रौप्य (वेटलिफ्टिंग 55 किलो)

5. जेरेमी लालरिनुंगा – सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 67 किलो)

6. अचिंता शेउली – सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 73 किलो)

7. सुशीला देवी – रौप्य पदक (जुडो 48 किलो)

8. विजय कुमार यादव- कांस्य (जुडो 60 किलो

9. हरजिंदर कौर – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 71 किलो)

10. महिला संघ – सुवर्णपदक (लॉन बॉल्स)

11. पुरुष संघ – सुवर्णपदक (टेबल टेनिस)

12. विकास ठाकूर – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 96 एमआय)

13 . रौप्य पदक (बॅडमिंटन)

14. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109 किलो)

15. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश)

16. तुलिका मान – रौप्य पदक (जुडो)

17. गुरदीप सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109+ किलो)

तेजा शंकर- 18. कांस्य पदक (उंच उडी)

हा विक्रम अमितच्या नावावर आहे.

26 वर्षीय अमित पंघाल हा बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष बॉक्सर आहे. अमित व्यतिरिक्त सहा भारतीय पुरुष बॉक्सर्सनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. विजेंदर सिंगने 2009 मध्ये ही कामगिरी केली होती, तर विकास कृष्णनने 2011 मध्ये आणि शिवा थापाने 2015 मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. याशिवाय गौरव विधुरी, मनीष कौशिक आणि आकाश कुमार यांनीही जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT