Rishabh Pant : अपघाताच्या एक महिन्यानंतर ऋषभ पंतबाबत आली ही मोठी अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rishabh Pant Health Update: भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Indian Team Star Batsman Rishabh Pant) याच्याबाबत एक चांगली बातमी समोर येत आहे. कार अपघातानंतर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल झालेल्या ऋषभ पंतला या आठवड्यात डिस्चार्ज (Discharge) मिळू शकतो. (BCCI Officer) बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

Rishabh Pant : मुंबईतला ‘तो’ फोटो पाहून उर्वशी रौतेलावर भडकले नेटकरी

30 डिसेंबरच्या पहाटे ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून रुरकी येथे घरी जात असताना अपघात झाला होता. यानंतर पंतला अनेक गंभीर दुखापतींमुळे डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तेथून एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले.

हे वाचलं का?

या आठवड्यात मिळणार डिस्चार्ज

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, ‘त्याच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली आहे. वैद्यकीय पथकाकडून एक चांगली बातमी समोर आली आहे. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. लोकांनाही जाणून घ्यायचे होते की, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार आहे. तर आता त्याला या आठवड्यात डिस्चार्ज मिळणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पंतला एका महिन्यात आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागेल. दुसरी शस्त्रक्रिया केव्हा होणार हे डॉक्टरच ठरवतील. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक डॉक्टर आणि रुग्णालय व्यवस्थापनाच्या सतत संपर्कात आहे. तो लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे.

असा झाला ऋषभ पंतच्या कारचा अपघात

डिसेंबर 2022 मध्ये बांग्लादेश दौऱ्यानंतर ऋषभ पंत थेट दुबईला ख्रिसमस साजरा करण्यासाठी गेला होता. येथे त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत ख्रिसमस साजरा केला. यानंतर ऋषभ पंत आपल्या देशात परतला आणि दिल्लीहून आपल्या गावी रुड़कीला त्याच्या कारने जात होता. दरम्यान, 30 डिसेंबरच्या पहाटे ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला. रुरकीजवळील गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. ऋषभ पंत कारमध्ये एकटाच होता आणि स्वतः गाडी चालवत होता. पंतने सांगितले की त्याने विंड स्क्रीन तोडली आणि बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली.

ADVERTISEMENT

Rishabh Pant : जखमी ऋषभ कधीपर्यंत मैदानावर परतणार? डॉक्टरांची माहिती

ADVERTISEMENT

एअरलिफ्ट करुन मुंबईला केले शिफ्ट

या अपघातानंतर ऋषभ पंतला तातडीने रुरकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. इथेही पंतच्या चेहऱ्यावर आणि इतर काही ठिकाणी किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. पण यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आणि पंतला एअरलिफ्ट करून ग्रीन कॉरिडॉरमधून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT