Angelo Mathews Time Out : सौरभ गांगुली होणार होता ‘टाइम आऊट’, पण…
angelo mathews time out : 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मध्ये सौरभ गांगुली टाइम आऊट ठरणार होता. पण, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने खिलाडूवृत्ती दाखवली आणि हे टळलं.
ADVERTISEMENT

Sourav Ganguly Angelo Mathews Time Out : 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अनेक रोमांचक सामने आणि अनेक वाद बघायला मिळत आहेत. पण, या सगळ्यात सोमवारी (6 नोव्हेंबर) श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात जे घडलं, ते ऐतिहासिक होतं. श्रीलंलेकचा अँजेलो मॅथ्यूज टाइम आऊट झाला. जे मॅथ्यूजसोबत घडलं, तसंच 16 वर्षांपूर्वी सौरभ गांगुलीसोबत घडलं होतं. पण, त्यातून तो थोडक्यात वाचला होता.
श्रीलंकेचा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज टाइम आऊट होण्याचा हा वाद सुरू झाला आहे. मॅथ्यूज आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट होणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. पण इथे महत्त्वाचं असं की, मॅथ्यूजच्या आधी भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली देखील एकदा टाइम आऊट होता होता वाचला होता.
Time Out : गांगुलीसोबत 16 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?
ही घटना घडली होती 16 वर्षांपूर्वी. त्यावेळी गांगुली बाद झाला असता तर आता अशा प्रकारे बाद होणारा मॅथ्यूज दुसरा फलंदाज ठरला असता. पण त्यावेळी दादा म्हणून दबदबा असलेला गांगुली टाइम आऊट होण्यातून थोडक्यात बचावला होता. आता हा प्रश्न नक्कीच चाहत्यांच्या मनात असेल की शेवटी ते प्रकरण काय होतं? आणि गांगुली त्यातून कसा वाचला?
हे ही वाचा >> कपटी वहिनीचे अनैतिक संबंध… नवऱ्याला सांगून नणंदेची क्रूर हत्या!
खरंतर, ही गोष्ट आहे 2007 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळची. जेव्हा भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन कसोटी सामना खेळला जात होता. त्या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने दुसऱ्या डावात तिसऱ्या षटकात दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स 6 धावांत गमावल्या. वीरेंद्र सेहवाग आणि वसीम जाफर बाद झाले.