Ind vs Eng T20I Series : या ३ प्रश्नांची उत्तरं शोधू शकेल का भारत?
टेस्ट सिरीजमध्ये ३-१ ने बाजी मारल्यानंतर विराट कोहलीचा भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. ५ टी-२० सामन्यांची मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवली जाणार आहे. इंग्लंडला हरवून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण यंदाच्या वर्षात भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान असणार आहे ते म्हणजे…वर्षाअखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचं. दुर्दैवी ! […]
ADVERTISEMENT
टेस्ट सिरीजमध्ये ३-१ ने बाजी मारल्यानंतर विराट कोहलीचा भारतीय संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. ५ टी-२० सामन्यांची मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर खेळवली जाणार आहे. इंग्लंडला हरवून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पण यंदाच्या वर्षात भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान असणार आहे ते म्हणजे…वर्षाअखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचं.
ADVERTISEMENT
दुर्दैवी ! वरुण चक्रवर्ती दुसऱ्यांदा फिटनेस टेस्ट फेल
इंग्लंडविरुद्ध टी-२० सिरीजनंतर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला कोणते प्लेअर्स वर्ल्डकपमध्ये खेळतील याचा अंदाज येईल. आगामी काळात एखादा प्लेअर इंज्युअर्ड झाला किंवा त्याचा फॉर्म हरवून बसला तर बॅटींग लाईनअप सेटल होण्याची हीच वेळ आहे असं वक्तव्य भारताचे बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. कारण इंग्लंडविरुद्धची टी-२० सिरीज झाल्यानंतर भारतीय प्लेअर्स आयपीएल खेळतील…यानंतर जुन महिन्यात श्रीलंका आणि ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी-२० सिरीज खेळेल. त्याआधी प्रमुख ३ प्रश्नांची उत्तरं भारतीय संघाला शोधावी लागणार आहेत.
हे वाचलं का?
ICC Player of The Month : रविचंद्रन आश्विन पुरस्काराचा मानकरी
१) ओपनिंगला कोण? तिढा सुटेल का?
ADVERTISEMENT
रोहित शर्मासोबत ओपनिंगला यायचं कोणी लोकेश राहुल की शिखर धवन हा प्रश्न गेल्या काही सिरीजपासून टीम इंडियाची पाठ सोडत नाहीये. २०१९ मध्ये राहुलला खराब परफॉर्मन्समुळे संघातलं स्थान गमवावं लागलं होतं…ज्यानंतर त्याने कामगिरीत सुधारणा केली आणि संघात कमबॅक केलं. २०२० मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात त्याला संधी मिळाली पण नंतर कोरोनामुळे क्रिकेटला ब्रेक लागला…पण नंतर युएईत झालेल्या आयपीएलमध्येही राहुलने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवत ऑरेंज कॅप पटकावली.
ADVERTISEMENT
दुसरीकडे शिखर धवन हा अनुभवी प्लेअरही भारतीय संघात आहे. परंतू कामगिरीतलं सातत्य हा शिखरसाठी नेहमी चर्चेचा विषय राहिलेला आहे. २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये पोहचवण्यात शिखरचा मोलाचा वाटा होता…परंतू या अनुभवी खेळाडूच्या कामगिरीत सातत्य नसणं संघाला महागात पडलं होतं. नुकत्याच विजय हजारे ट्रॉफीमध्येही शिखरने चांगली कामगिरीत करत आपल्यातला फॉर्म अजुनही कायम असल्याचं दाखवलं होतं. पण शिखर धवनचं इंज्युरी प्रोन असणं हा देखील एक मुद्दा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला विसरुन चालता येणार नाहीये.
त्यामुळे रोहितसोबत यावेळी जो कोणी प्लेअर ओपनिंगला येईल ती जोडी वर्ल्डकप पर्यंत कायम राहिली पाहीजे. कारण ओपनिंग काँबिनेशनमध्ये बदल केले की काय घडतं हे आपण २०१९ वर्ल्डकपला अनुभवलं होतं. त्यामुळे रोहितसोबत राहुल ओपनिंगला येणार की शिखर या प्रश्नाचं उत्तर टीम इंडियाला लवकर शोधावं लागेल.
२) ऋषभ पंतबद्दल ठोस निर्णय घेणं गरजेचं –
मध्यंतरीच्या काळात ऋषभ पंत फॉर्मात नव्हता…ज्याचा फटका टीम इंडियाला बसला. यानंतर २०२० मध्ये न्यूझीलंडमध्ये आणि ऑस्ट्रेलियात लिमीटेड ओव्हर सिरीजमध्ये लोकेश राहुलने विकेटकिपींग केली. सरप्राईजिंगली राहुलने आपली ही नवीन जबाबदारीही चोख बजावली…पण ऋषभ पंत आता फॉर्मात आल्यामुळे टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला विकेटकिपर – बॅट्समनचा प्रश्नही सोडवावा लागणार आहे. टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ सध्या पंतच्या कामगिरीवर खुश आहे. मुळात म्हणजे पंतला जर पाठींबा दिला आणि त्याला त्याच्या मनासारखं खेळायला दिलं तर तो काय धमाल करु शकतो हे आपण ऑस्ट्रेलियात शेवटच्या दोन टेस्टमध्ये आणि इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्ये पाहिलंय. त्यामुळे अशा इम्पॅक्टफूल प्लेअरला डावण्याची चूक मॅनेजमेट करेल असं वाटत नाही. त्यामुळे पंतचा लिमीटेड ओव्हर सिरीजमध्येही रोल फिक्स करुन त्याला असाच पाठींबा मिळणं गरजेचं आहे.
३) हार्दिक पांड्या जुन्या रुपात येणं गरजेचं –
ऑलराऊंडर म्हणून हार्दिकची भारतीय संघाच निवड झाली होती. परंतू गेल्या काही वर्षांपासून हार्दिक पाठीच्या दुखापतीमुळे बॉलिंग करत नाहीये…यामुळेच हार्दिकने टेस्ट संघातलं आपलं स्थान गमावलं आहे…आणि हार्दिक बॉलिंग करु शकत नसल्यामुळे टीम इंडियाला एक जास्तीचा बॉलर घेऊन खेळावं लागत आहे. हार्दिक बॅटींगमध्ये आपली कामगिरी चोख बजावतो आहे….पण मिडल ओव्हरमध्ये जिथे टीम इंडियाला गरज असते तिकडे हार्दिकचा अनुभव भारतीय संघाला मिळत नाहीये. त्यामुळे हार्दिकने आता जुन्या रुपात परत येणं गरजेचं आहे. रोहित शर्मानेही पत्रकार परिषदेत असं बोलून दाखवलंय…हार्दिक जर इंग्लंड सिरीजमध्ये बॉलिंग करायला लागला तर टीम इंडियाचे अर्धे अधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात.
थोड्याफार अर्थाने हे ३ मुद्दे टीम इंडियाच्या वर्ल्ड प्रिपरेशनसाठी महत्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध सिरीजमध्ये टीम इंडियाला या प्रश्नांची उत्तर मिळतायत का हे पाहणं इंटरेस्टींग ठरणार आहे.
BLOG : दृष्ट लागण्याजोगे सारे…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT