IPL 2021 साठी BCCI ची तयारी सुरु, टेस्ट सिरीजच्या वेळापत्रकात बदल करण्याची ECB ला विनंती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर हंगाम मध्येच स्थगित करावा लागलेल्या बीसीसीआयने उर्वरित सिझनची तयारी सुरु केली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यात टेस्ट सिरीजच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती बीसीसीआयने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला केल्याची बातमी ESPNCricinfo ने दिली आहे. इंग्लंडमधील काउंटी संघांनी याआधीच बीसीसीआयला आयपीएलचा उर्वरित हंगाम इंग्लंडमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव दिला आहे. परंतू अद्याप हा प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचं ECB ने म्हटलंय.

ADVERTISEMENT

WTC Final : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी रविंद्र जाडेजाचं पुनरागमन

सध्याच्या घडीला ठरवण्यात आलेल्या वेळापत्रकाप्रमाणे WTC ची फायनल मॅच झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ टेस्ट मॅचची सिरीज खेळवली जाणार आहे. ४ ऑगस्टपासून पहिली टेस्ट खेळवली जाणार असून १४ सप्टेंबरला या दौऱ्याचा शेवट होणार आहे. परंतू शेवटची टेस्ट मॅच ७ सप्टेंबरच्या दरम्यान संपल्यास बीसीसीआयला आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवण्यासाठी हवा असलेला कालावधी मिळू शकतो. आयपीएल २०२१ चे ३१ सामने फक्त खेळवायचे बाकी असून यामुळे टी-२० वर्ल्डकपआधी खेळाडूंना चांगली तयारी होईल अशीही बीसीसीआयला आशा आहे.

हे वाचलं का?

Team India च्या खेळाडूंना लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळणार

परंतू इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेच्या कार्यक्रमात बदल केल्यास इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या पुढील कार्यक्रमांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने केलेल्या विनंतीचा विचार करायचा ठरवल्यास ECB ला आपल्या पुढील वेळापत्रकात अनेक बदल करावा लागेल. इंग्लंडव्यतिरीक्त युएई हा देखील एक पर्याय बीसीसीआयसमोर उर्वरित हंगाम पूर्ण करण्यासाठी असणार आहे.

ADVERTISEMENT

IPL 2021 चा उर्वरित हंगाम भारतात खेळवण्याची शक्यता कमीच – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT