'क्रिकेटर अमित मिश्राचे अनेक तरुणींसोबत...', आरोप करणारी ती मॉडेल कोण?
Amit Mishra wife Garima Case: भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्रा यांच्यावर त्याची पत्नी गरिमा तिवारी हिने अत्यंत गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT

Amit Mishra and Garima Tiwari: कानपूर: भारताचा माजी क्रिकेटपटू अमित मिश्रा सध्या प्रचंड अडचणीत आला आहे. अमित मिश्रा याची पत्नी आणि मॉडेल गरिमा तिवारी हिने आपल्या पतीवर काही गंभीर आरोप केले आहेत. गरिमाने तिचा पती आणि सासरच्या लोकांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. गरिमाचा आरोप आहे की, अमित आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी गाडी आणि 10 लाख रुपयांसाठी तिच्यावर अत्याचार केले. याशिवाय, अमित मिश्राचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही तिने केला आहे. याशिवाय गरिमाने अमितकडून 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कानपूरमधील मीरपूर कॅन्ट येथील रहिवासी अमित मिश्रा याच्यावर त्यांची पत्नी गरिमा तिवारी हिने घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हा खटला न्यायिक दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये अमित आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध 1 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. न्यायालयाने या सर्वांना नोटीस पाठवल्या आहेत आणि पुढील सुनावणी 26 मे रोजी होईल.
हे ही वाचा>> Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदल झालेल्या अनाया बांगरने सांगितलं हादरवून टाकणारं सत्य
कोण आहे गरिमा तिवारी?
गरिमा ही एक मॉडेल आहे. या प्रकरणात, तिने न्यायालयाकडे दरमहा 50,000 रुपये भत्ता, तिचे दागिने परत मिळावेत आणि तिच्या पतीच्या घरात राहण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली आहे. तिने सांगितले की, तिचे लग्न 26 एप्रिल 2021 रोजी अमितशी झाले होते, जो आरबीआयमध्ये असिस्टंट मॅनेजर आहे.
अडीच लाख रुपये घेतल्यानंतर माझी सासरी झाली पाठवणी: गरिमा
गरिमाच्या म्हणण्यानुसार, 'लग्नाच्या वेळी अमितच्या वडिलांनी 10 लाख रुपये आणि होंडा सिटी कारची मागणी केली होती. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मला घरी नेण्यास नकार देण्यात आला होता. नंतर, अडीच लाख रुपये देऊन माझी पाठवणी करण्यात आलेली.'










