Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदल झालेल्या अनाया बांगरने सांगितलं हादरवून टाकणारं सत्य
Sanjay Bangar Girl Anaya Bangar: 'क्रिकेटर्संनी न्यूड फोटो पाठवले अन्', लिंग बदलून अनाया बांगर सांगतिलं हादरवून टाकणारं सत्य भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने आता त्याचा शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला. 'आर्यन ते अनाया बांगर' या प्रवासाबद्दल त्याने आपल्या मुलाखतीत बरेच खुलासे केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिग्गज क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या मुलाने केला लिंगबदल

आर्यन बांगर ते अनाया बांगर पर्यंतचा प्रवास

अनाया बांगरचे सहकारी क्रिकेटपटूंवर आरोप
Anaya Bangar Interview: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कोच संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगरने शस्त्रक्रियेद्वारे लिंगबदल केला. अनाया बांगर अशी तिची नवी ओळख आहे. अनाया ही तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या जीवनातील धक्कादायक गोष्टींबद्दल खुलासा केला आहे. अनाया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. या मुलाखतीत तिने बऱ्याच क्रिकेटपटूंवर गंभीर आरोप लावले आहेत.
'बैठकी' या लल्लनटॉपच्या एका विशेष कार्यक्रमात मीडिया इन्फ्लुएन्सर अनाया बांगर हिने उपस्थिती लावली होती. अनाया तिच्या लिंगबदलापूर्वी आर्यन बांगर या नावाने ओळखला जात होता. या मुलाखतीत अनायाने ट्रान्सजेंडर महिलेच्या रूपातील तिचे अनुभव शेअर केले आहेत. या मुलाखतीतील चर्चेदरम्यान तिने सांगितले की, काही क्रिकेटपटूंनी त्यांचे न्यूड फोटोज पाठवले होते आणि शिव्यासुद्धा दिल्या होत्या, असे ती म्हणाली.
अनायाने या मुलाखतीत तिच्या जेंडर चेंज शस्त्रक्रियेबद्दल सांगितलं. तिच्या जीवनातील या मोठ्या बदलामुळे तिच्या क्रिकेट करिअरसह बऱ्याच गोष्टींना वेगळेच वळण मिळाले.
हे ही वाचा: 'अनैतिक संबंध ठेवतो काय...', 6 जणांनी मिळून तलवारीने कापलं तरुणाचं गुप्तांग
क्रिकेटपटूंचा अनाया बांगरला पाठिंबा
लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटपटूंकडून किती पाठिंबा मिळाला? यावर आपलं मत व्यक्त करताना ती म्हणाली, "मला इतर क्रिकेटपटूंकडून पाठिंबा तर मिळाला, परंतु काही लोकांनी मला त्रासही दिला आहे. काही क्रिकेटपटूंनी तर मला त्यांचे नग्न फोटोही पाठवले." मुलाखतीदरम्यान तिने अशा व्यक्तीबद्दल सर्वांना सांगितले जी सर्वांसमोर तिला शिवीगाळ करायची. तोच माणूस तिच्या जवळ जाऊन बसायचा आणि तिचे फोटोज मागायचा, असे तिने सांगितले.