Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का? BCCI ने दिली मोठी अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

champions trophy 2025 india vs pakistan will team india go to pakistan icc meeting sri lanka
टीम इंडियाने नुकताच आयसीसीचा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
social share
google news

Champions trophy 2025, india vs pakistan : टीम इंडियाने नुकताच आयसीसीचा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. या वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचे लक्ष चॅम्पियन ट्रॉफी 2025 (Champions trophy 2025) कडे लागले आहे. या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानमध्ये (pakistan)   होणार आहे. भारत पाकिस्तान हे दोन्ही कट्टरप्रतिस्पर्धी संघ यानिमित्त आमने सामनेही येणार आहेत. पण भारत ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार का? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता मोठी अपडेट समोर आली आहे. (champions trophy 2025 india vs pakistan will team india go to pakistan icc meeting sri lanka) 

ADVERTISEMENT

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमान यंदाच्या वर्षी पाकिस्तानकडे असणार आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासाठी तयारी सुरू केली असून आयसीसीकडे ड्राफ्टही सादर केला आहे. या ड्राफ्टनुसार भारताचे सामने लाहोरमध्ये होणार आहेत, पण टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे. 

हे ही वाचा : रवींद्र वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण

स्पोर्ट्स तकला मिळालेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे.  पण श्रीलंकेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात चर्चा होत आहे कारण या महिन्यात श्रीलंकेत आयसीसीची बैठक होणार आहे आणि बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड निश्चितपणे टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याचा मुद्दा उपस्थित करेल.

हे वाचलं का?

दरम्यान गेल्या वर्षी पार पडलेल्या आशिया कपच 2023 च्या वेळेस स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. पण आशिया चषक स्पर्धेसाठीही भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला नाही आणि ती स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळली गेली, त्यानुसार भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळले गेले. 

चॅम्पियन्स ट्रॉफी देखील हायब्रिड मॉडेलवर खेळवण्याची चर्चा सुरु आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला अजून माहित नाही. यावर आम्ही चर्चा केलेली नाही. सरकार जो काही निर्णय घेईल, आम्ही त्याचे पालन करू. ही आयसीसीची स्पर्धा आहे, आम्ही स्पर्धेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. हा आयसीसीचा निर्णय आहे. भविष्याबद्दल चर्चा करू नका. आयसीसीच्या पुढील बैठकीत चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत काही गोष्टी स्पष्ट होतील.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Mazi ladki bahin yojana online form : एक रुपयाही खर्च न करता घरीच भरा अर्ज! जाणून घ्या कसं? 

दरम्यान अद्याप भारताच पाकिस्तान जाण निश्चित नाही आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ADVERTISEMENT

दोन गटात आठ संघ

भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात ठेवण्यात आले आहे. ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. अलीकडेच, आयसीसी इव्हेंट्सचे प्रमुख ख्रिस टेटली यांनी इस्लामाबादमध्ये पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांची भेट घेतली. त्यानंतर सुरक्षा पथकाने स्थळांची आणि इतर व्यवस्थांची पाहणी केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT