Ravindra Waikar : खासदार वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण

मुंबई तक

Ravindra Waikar News : उद्धव ठाकरेंची साथ सोडून रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत गेले. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून वायकर खासदार झाले आणि आता त्यांच्या मागील आरोपांचे शुक्लकाष्ठही संपले आहेत. मुंबई पोलिसांनी वायकरांना क्लीन चिट दिली आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Ravindra Waikar. (Picture: X/@RavindraWaikar)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड प्रकरणातून सुटका

point

मुंबई पोलिसांनी सी समरी रिपोर्ट न्यायालयात दाखल केला

point

मुंबई महापालिकेने अर्धवट माहिती आणि गैरसमजातून तक्रार केली

Ravindra Waikar : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना झालेल्या आरोपांच्या फैरीतून खासदार रवींद्र वायकर लवकरच मुक्त होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या आरोपांतून क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. त्यात धक्कादायक कारण पोलिसांनी दिले आहे. (Mumbai Police’s Economic Offences Wing (EOW) filed a closure report in a Jogeshwari land case registered against Ravindra Waikar, his wife Manisha Waikar and four close associates)

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट न्यायालयात सादर केला आहे. गुरुवारी (4 जुलै) हा रिपोर्ट सादर करण्यात आला असून, आता कोर्टाने तो स्वीकारला तर वायकर प्रकरणातून मुक्त होतील. 

रवींद्र वायकरांना क्लीन चिट का?

जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणात मुंबई महापालिकेने तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आता आर्थिक गुन्हे शाखेने सी समरी रिपोर्ट न्यायालयात दाखल केला असून, मुंबई महापालिकेने अपूर्ण माहिती आणि गैरसमजातून तक्रार दिली होती, असे म्हटले आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, क्लोजर रिपोर्ट गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आला. आता आम्ही पुढील निर्देशाची वाट बघत आहोत.

हे वाचलं का?

    follow whatsapp