कोरोनाच्या महामारीत चेन्नई सुपर किंग्जचा मदतीचा हात; 450 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर केले दान

मुंबई तक

देशात सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. अशा परिस्थितीत बेड्स, ऑक्सिजन तसंच औषधांचा तुटवडा भासतोय. या गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहे. तर आता आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाने देखील कोरोनाच्या या महामारीत योगदान दिलं आहे. सीएसकेने तामिळनाडूतील कोरोना रूग्णांसाठी 450 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची व्यवस्था केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशात सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. अशा परिस्थितीत बेड्स, ऑक्सिजन तसंच औषधांचा तुटवडा भासतोय. या गोष्टींची कमतरता भासू नये यासाठी अनेकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले आहे. तर आता आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाने देखील कोरोनाच्या या महामारीत योगदान दिलं आहे. सीएसकेने तामिळनाडूतील कोरोना रूग्णांसाठी 450 ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटरची व्यवस्था केली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे आऱ श्रीनिवासन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांच्याकडे शनिवारी हे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर सोपवले. यावेळी तामिळनाडू क्रिकेट संघाच्या अध्यक्ष रूपा गुरुनाथ देखील उपस्थित होत्या.

दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही कोरोनाच्या लढ्याविरोधात दान केलं आहे. या दोघांनी 2 कोटी रूपये दान केले असून 7 कोटी रूपये जमा करण्याचं लक्ष्य ठेवलंय. मुख्य म्हणजे 24 तासांच्या आत अर्ध लक्ष्य गाठण्यास त्यांना यश मिळालं आहे.

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत अजिंक्यची अनोखी मदत, ‘मिशन वायू’साठी ३० Oxygen Concentrators दान

तर कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत मिशन वायू या उपक्रमासाठी 30 Oxygen concentrators दान केले होते. अजिंक्यची ही मदत राज्याच्या ग्रामीण भागात मिशन वायू अंतर्गत पोहचवली जाणार आहे. अजिंक्य रहाणेव्यतिरीक्त आतापर्यंत पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, शिखर धवन, जयदेव उनाडकट, निकोलस पूरन या खेळाडूंनी भारतातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाविरुद्ध लढाईत मदत म्हणून आर्थिक हातभार लावला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp