IPL Auction 2024 : दिल्ली कॅपिटल्सचा 2 भारतीय क्रिकेटपटूंना झटका! दाखवला बाहेरचा रस्ता

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Delhi Capitals has taken a big step and decided to exclude two Indian batsmen. first is Sarfaraz Khan and second is Manish Pandey.
Delhi Capitals has taken a big step and decided to exclude two Indian batsmen. first is Sarfaraz Khan and second is Manish Pandey.
social share
google news

Delhi Capitals News : आयपीएलच्या आगामी लिलावापूर्वी फ्रँचायझींनी पुढच्या हंगामाबाबत धोरणात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलचा लिलाव होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने दोन भारतीय फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. एकदाही विजेतेपद न जिंकलेल्या दिल्ली फ्रँचायझीने सरफराज खान आणि मनीष पांडे यांना टीममधून काढले आहे. (Delhi Capitals removed these two Indian players before the ipl auction 2024)

पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. सरफराज खान आणि मनिष पांडे हे दोघेही गेल्या मोसमात संघासाठी धमाकेदार कामगिरी करू शकले नव्हते. त्यामुळे संघ गुणतालिकेत तळाशी राहिला होता. सरफराजला दिल्लीने 20 लाख रुपयांत, तर मनीषला 2.40 कोटी रुपयांना घेतले होते. या दोघांना संघातून काढल्याने दिल्लीकडे आता अतिरिक्त 2.60 कोटी रुपये असणार आहेत.

सरफराज खानची निराशाजनक कामगिरी

26 वर्षीय सरफराज आयपीएल 2023 मध्ये दिल्लीकडून चार सामने खेळला होता. यामध्ये त्याला केवळ 53 धावा करता आल्या. 30 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये त्याने सहा सामन्यांत 91 धावा केल्या होत्या. संघाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने दिल्लीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> IPL Transfer Window 2024 : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार? रोहित शर्मा बदलणार टीम!

गेल्या काही वर्षांत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या होत्या, पण त्या कामगिरीची पुनरावृत्ती त्याला आयपीएलमध्ये करता आली नाही. दिल्लीपूर्वी तो पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये खेळला आहे.

मनीष पांडेनेही केला अपेक्षाभंग

आयपीएलमध्ये अलीकडच्या काळात मनीष पांडेचा फॉर्मही निराशाजनक राहिला आहे. गेल्या मोसमात त्याने 10 सामने खेळून 150 धावाच केल्या होत्या. यामध्ये 50 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याचा स्ट्राइक रेट 109.59 होता, जो या फॉरमॅटच्या दृष्टीने चांगला म्हणता येणार नाही.

ADVERTISEMENT

2022 मध्ये तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. त्यावेळीही त्याची कामगिरी जेमतेमच राहिली. सहा सामन्यांत तो केवळ 88 धावा करू शकला. लखनौने त्याच्यासाठी 4.60 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर त्याला घेण्यासाठी तीन संघांमध्ये चढाओढ झाली. गेल्या लिलावात दिल्लीशिवाय आरसीबीनेही त्याला घेण्यासाठी प्रयत्न केले होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> IPL ऑक्शनआधीच मोठा करार! राजस्थानकडून 10 करोडमध्ये ‘हा’ खेळाडू खरेदी

ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स मधल्या फळीत फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाच्या शोधात आहे. चांगला खेळाडू घेण्यासाठी दिल्ली आगामी लिलावापूर्वी पैसे वाचवायचे प्रयत्न करत आहे. आयपीएल 2024 चा लिलाव होण्यापूर्वी आतापर्यंत दोन व्यवहार झाले आहेत. मुंबई इंडियन्सने रोमारियो शेफर्डला लखनौकडून घेतले. लखनौने आवेश खानला राजस्थान रॉयल्सला देऊन देवदत्त पडिक्कलला आपल्या संघात घेतले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT