icc test championship: भारत-ऑस्ट्रेलिया भिडणार; कधी, कुठे होणार फायनल?
world test championship 2023 final india vs australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यापूर्वीच भारताचं वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमधील स्थान निश्चित झालं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दाखल होत भारताने इतिहास घडवला आहे. भारताने दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ऑस्ट्रेलियासोबत भारताचा मुकाबला होणार आहे. (icc test championship final 2023 date and time and venue) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप […]
ADVERTISEMENT
world test championship 2023 final india vs australia : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्यापूर्वीच भारताचं वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलमधील स्थान निश्चित झालं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दाखल होत भारताने इतिहास घडवला आहे. भारताने दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता ऑस्ट्रेलियासोबत भारताचा मुकाबला होणार आहे. (icc test championship final 2023 date and time and venue)
ADVERTISEMENT
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारत आणि ऑस्ट्रेलियात होणार हे निश्चित झालं. WTCच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आधीच दाखल झालेला आहे. आता 7 ते 11 जूनला लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत-ऑस्ट्रेलियात सामना खेळवला जाणार आहे.
या सामन्यासाठी 12 जूनही राखीव ठेवण्यात आली आहे. भारत सलग दुसऱ्यांदा WTCच्या फायनलमध्ये दाखल झाला असून, यापूर्वी न्यूझीलंडने भारताला फायनलमध्ये हरवलं होतं.
हे वाचलं का?
श्रीलंकेच्या पराभवाने भारताचं स्थान केलं निश्चित
इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्याने WTC फायनलची समीकरण बदलली होती. WTC फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताचं लक्ष न्यूझीलंड-श्रीलंके कसोटी मालिकेकडे होतं. WTC फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी श्रीलंकेला मालिका 2-0 जिंकणं आवश्यक होतं, मात्र ते होऊ शकलं नाही आणि भारताचं निश्चित झालं.
The World Test Championship final is locked in! ? pic.twitter.com/gp231vF3Ic
— cricket.com.au (@cricketcomau) March 13, 2023
ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्यापूर्वीच भारत WTC च्या फायनलमध्ये
न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत केल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्यापूर्वीच भारताचं WTC फायनलमधील स्थान निश्चित झालं. न्यूझीलंडमुळे भारताला WTC फायनलमधील तिकीट मिळालं. न्यूझीलंड या सामन्यात पराभूत झाला असता, तर भारताचं WTC मध्ये पोहोचणं अवघड झालं असतं.
ADVERTISEMENT
WTC: भारताने किती कसोटी खेळल्या?
भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताने 18 सामने खेळले. यात 10 सामने जिंकले, तर 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. 3 सामने अनिर्णित राहिले. टीम इंडिया पाॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने 19 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 11 जिंकत पहिला क्रमांक कायम ठेवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघाला 6-6 मालिका खेळाव्या लागतात. यातील तीन मायदेशात, तर तीन परदेशात असतात.
India ?? ?? Australia ??
The final Test ends in a draw as #TeamIndia win the Border-Gavaskar series 2-1 ?#INDvAUS pic.twitter.com/dwwuLhQ1UT
— BCCI (@BCCI) March 13, 2023
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची कामगिरी
-इंग्लंडविरुद्ध भारताने 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली, ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.
-न्यूझीलंडविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका झाली. ही मालिका भारताने 1-0 अशा फरकाने जिंकली.
-दक्षिण ऑफ्रिकेविरुद्ध भारताची 3 सामन्यांची कसोटी मालिका झाली. यात भारताचा 1-2 असा पराभव झाला.
-श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 अशा फरकाने विजय मिळवला.
-बांग्लादेशविरुद्धही 2 सामन्यांची कसोटी मालिका झाली, यात भारताने 2-0 असा विजय मिळवला.
-ऑस्ट्रेलिया विरुद्धची 4 सामन्यांची कसोटी मालिका भारताने 2-1 अशा फरकाने जिंकली. शेवटचा सामना अनिर्णित राहिला.
icc test championship 2023 points table: भारताचे किती पॉईंट?
-ऑस्ट्रेलिया विजयाची सरासरी 68.52 टक्के, 11 विजय, 3 पराभव, 4 अनिर्णित
-भारत विजयाची सरासरी 60.29 टक्के विजय, 10 विजय, 5 पराभव आणि 2 अनिर्णित
-दक्षिण आफ्रिका विजयाची सरासरी 55.56 टक्के विजय, 8 जिंकले, 6 मध्ये पराभूत, 1 अनिर्णित
-श्रीलंका विजयाची सरासरी 48.48 टक्के, 5 जिंकले, 5 मध्ये पराभूत, 1 अनिर्णित
icc test championship Date and venue: वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल कधी आणि कुठे?
वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी होणार आहे.
7 ते 11 जून, 2023 फायनल होणार.
वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी 12 जून तारीख राखीव ठेवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT