Ind vs SA : दुसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू संघाबाहेर
टीम इंडिया येत्या 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये दुसरा टेस्ट सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी सरावालाही संघाने सुरूवात केली आहे. या दरम्यान नेटमध्ये सराव करताना वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला दुखापत झाली आहे.
ADVERTISEMENT
Ind vs Aus 2nd test Shardul Thakur injured : साऊथ आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. या सामन्यात साऊथ आफ्रिका संघाने एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. आता दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या दरम्यानच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू शार्दुल ठाकूरला दुखापत झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या टेस्टमधून तो बाहेर जाण्याची शक्यता आहे.(ind vs aus 2nd test shardul thakur injured likely to miss test match india vs south africa)
टीम इंडिया येत्या 3 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये दुसरा टेस्ट सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी सरावालाही संघाने सुरूवात केली आहे. या दरम्यान नेटमध्ये सराव करताना वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला दुखापत झाली आहे. शार्दुल ठाकूरच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे आता तो दुसऱ्या टेस्टमधून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
That’s that from the Test at Centurion.
South Africa win by an innings and 32 runs, lead the series 1-0.
Scorecard – https://t.co/032B8Fmvt4 #SAvIND pic.twitter.com/Sd7hJSxqGK
— BCCI (@BCCI) December 28, 2023
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Nagpur Bank Scam : सुनील केदार तुरूंगातच राहणार, सुनावणीत काय घडलं?
नेट सेशन सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांनीच ही घटना घडली. शार्दुलला शॉर्ट बॉलचा बचाव करता आला नाही, त्यानंतर बॉल त्याच्या खांद्यावर आदळला. यावेळी बॉल लागताच तो वेदनांनी ओरडला होता. तरीही शार्दुलने नेटमध्ये फलंदाजी सुरूच ठेवली होती. आता गरज भासल्यास शार्दुल ठाकूरच्या खांद्याची स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर ही दुखापत किती गंभीर आहे. हे कळणार आहे.
दरम्यान आता शार्दुल ठाकूर लवकरच तंदुरुस्त होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.शार्दुल ठाकूरने पहिल्या कसोटीत अवघ्या 19 ओव्हरमध्ये 101 धावा दिल्या आणि फलंदाजीतही त्याची कामगिरी चांगली नव्हती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Ayodhya Ram Temple: ‘मला निमंत्रण…’, उद्धव ठाकरेंनी कॅमेऱ्यासमोरच सांगून टाकलं!
भारतीय कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर. , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT