Video : साऊथ आफ्रिकेचा बॉलर तोंडावर पडला, राहुलला स्लेज करायला गेला अन्…
केएल राहुल मैदानावर अतिशय शांतपणे खेळतो आणि त्याला फक्त बॅटनेच उत्तर द्यायला आवडते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केएल राहुल क्वचितच मैदानावर कोणत्याही गोलंदाजासोबत भिडताना दिसला आहे.
ADVERTISEMENT
Marco Jansen Sledge Kl Rahul,South Africa Vs india : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅच सूरू आहे. या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया 245 धावांवर ऑल आऊट झाली आहे. टीम इंडियाकडून के एल राहुलने (KL Rahul) एकाकी झुंज देऊन शतक ठोकलं होते. या शतकाच्या बळावरच टीम इंडिया (Team India) 200 चा पल्ला गाठू शकली आहे. या सामन्यात मैदानात स्लेजिंगचाही प्रकार घडला आहेत. साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जेनसनने (Marco Jansen) केएल राहुलसोबत स्लेजिंग केली होती. या स्लेजिंगला राहुलने हसून उत्तर दिले आहे. त्याच्या या रिअॅक्शनची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.(ind vs sa boxing day test marco jansen sledge kl rahul got such reply he will remember south africa vs team india)
ADVERTISEMENT
सेंच्युरीयनच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीस उतरली होती. टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि रोहित शर्मा सलामीला उतरले होते. मात्र टीम इंडियाची सूरूवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा 5 तर गिल 2 धावावर बाद झाला होता. त्यानंतर यशस्वी जयस्वालने दुहेरी धावसंख्या गाठून मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र तो देखील 17 धावावर बाद झाला.
हे ही वाचा : Sharad Pawar : “काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार…”, आव्हाडांनी इतिहासच काढला
— Bangladesh vs Sri Lanka (@Hanji_CricDekho) December 26, 2023
हे वाचलं का?
यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोहली 38 आणि अय्यर 31 धावावर बाद झाला होता. यानंतर के एल राहुलने एकट्याने डाव सावरला होता. त्याला शार्दुलच्या 24 धावांची साथ लाभली होती. बाकी इतर खेळाडू एकेरी धावसंख्येवर बाद झाले होते.
राहुलसोबत मैदानात स्लेजिंग
एकीकडे टीम इंडियाचे सर्वच खेळाडू साऊथ आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकत असतान राहुल मात्र विकेट राखून उत्कृष्ट खेळी करत होता. या दरम्यान साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज मार्को जेनसनने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राहुलने त्याला ज्याप्रकारे उत्तर दिले. हे उत्तर त्याला आयुष्यभर लक्षात राहणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Maharashtra Politics : खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?
केएल राहुल मैदानावर अतिशय शांतपणे खेळतो आणि त्याला फक्त बॅटनेच उत्तर द्यायला आवडते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केएल राहुल क्वचितच मैदानावर कोणत्याही गोलंदाजासोबत भिडताना दिसला आहे. इकडे जेनसेन त्याला स्लेज करायला आला तेव्हा केएल राहुलने त्याला (हसत) स्माईली उत्तर दिले. आता केएल राहुलची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याचे खूप कौतुक होत आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडियाने पहिल्या डावात 245 धावा केल्या आहेत. तर आता साऊथ आफ्रिकेचा पहिला डाव सुरू आहे. या डावात साऊथ आफ्रिका 100 धावांचा पल्ला गाठत आहेत. आणि त्यांनी एक विकेट गमावला आहे. आता साऊथ आफ्रिका पहिला डाव किती धावावर घोषित करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT