शिखर धवन की हार्दीक पांड्या? श्रीलंका दौऱ्यासाठी कॅप्टन निवडीवरुन BCCI समोर पेच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जुन महिन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध WTC ची फायनल मॅच खेळत असताना त्याच दरम्यान दुसरा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय तरुण खेळाडूंना संधी देणार आहे. परंतू या संघाचं नेतृत्व करणार कोण यावरुन सध्या बीसीसीआयसमोर पेच निर्माण झालाय.

ADVERTISEMENT

श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत?

कसोटी क्रिकेट न खेळणाऱ्या खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात ३ वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेत संधी मिळेल. सध्याच्या घडीला अनुभवी शिखर धवन की अष्टपैलू हार्दिक पांड्या असा पेच निवड समिती आणि BCCI समोर तयार झाला आहे. “श्रीलंका दौऱ्यापर्यंत श्रेयस अय्यर आपल्या दुखापतीमधून सावरला असेल की नाही हे आता सांगणं कठीण आहे. त्याला ज्या पद्धतीची दुखापत झाली होती, त्यात योग्य आराम आणि त्यानंतर फिटनेस सिद्ध करावा लागतो. यात किमान ४ महिने जाऊ शकतात.” BCCI च्या निवड समितीशी संबंधित एका अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली.

हे वाचलं का?

श्रीलंका दौऱ्यासाठी BCCI उर्वरित खेळाडूंना संधी देणार, स्टार खेळाडूंना विश्रांती

श्रेयस या दौऱ्यासाठी उपलब्ध असता तर साहजिकपणे त्याला कॅप्टन्सीसाठी विचार झाला असता. त्यामुळे आता आमच्यासमोर शिखर आणि हार्दिक यांचा पर्याय आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारताचा वन-डे संघ ५ जुलै रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर २८ जुलैला तो श्रीलंकेतून भारताला रवाना होईल. श्रीलंकेतील कोणत्या मैदानावर सामने खेळवले जातील याबद्दल माहिती समजू शकलेली नाही, तरीही हंबनटोटा आणि दम्बुला येखील मैदानावर हे सामने खेळवले जाऊ शकतात. २०१८ साली झालेल्या निदहास ट्रॉफीनंतर भारतीय संघ श्रीलंकेत एकही सामना खेळलेला नाहीये.

ADVERTISEMENT

WTC Final : भारतीय संघाची घोषणा, अनुभवी रविंद्र जाडेजाचं पुनरागमन

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT