Ind Vs Aus Final : भारताचे 241 चं टार्गेटही ऑस्ट्रेलियावर पडणार भारी, कारण…
भारताने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले असले तरी ते त्या संघासाठी सोपे नाही कारण, इग्लंडबरोबर झालेल्या सामन्यात 230 धावांचा टप्पा गाठणेही त्यांना शक्य झाले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघालाही 241 धावांचा टप्पा पार करणे मुश्किल जाणार आहे.
ADVERTISEMENT
India vs Australia Final : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या (World Cup 2023) अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (INd Vs Aus) यांच्यामध्ये अगदी जोरदारपणे सामना झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात टीम इंडियाने 50 षटकांमध्ये सर्व गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. अंतिम सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती. या सामन्यात रोहित शर्मा पूर्ण फॉर्ममध्ये खेळत होता. कर्णधार म्हणून रोहितने अगदी शानदार अशी फलंदाजी करत 31 चेंडूमध्ये 47 धावांची शानदार खेळी केली. रोहित शर्माने या सामन्यात 4 चौकार आणि 3 षटकार मारले होते.
ADVERTISEMENT
भारताचा डाव गडगडला
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मात्र भारताचा डाव गडगडला. त्याचा परिणाम टीम इंडियाच्या खेळावर झाला. या सामन्यात कोहली आणि राहुलने धावा रचण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी म्हणावी तशी धावसंख्याही करु शकले नाहीत. आणि 109 चेंडूमध्ये त्यांनी 67 धावांची भागीदारी करत ते तंबूत परतले.
हे ही वाचा >> WC Final 2023 : वर्ल्ड कप विजेत्या संघावर होणार पैशाचा पाऊस! किती बक्षीस रक्कम मिळणार?
इंग्लंडचा संघ गारद
या दोघांच्या प्रयत्नानंतर सूर्यकुमार यादवही अहमदाबादच्या खेळपट्टीवर भारतीय संघासाठी लढताना दिसून आला.भारतीय संघाने 240 धावा केल्या असल्या तरी कांगारूसाठी या धावा कमी नसणार आहेत. कारण तुम्हाला लखनऊमध्ये झालेला इंग्लंडविरुद्धचा सामना आठवत असेल त्यांनाही 230 धावा करणे शक्य झाले नव्हते. त्या सामन्यात मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी कहर केला होता. आणि इंग्लंडचा संघ अवघ्या 129 धावांवरच गारद झाला होता.
हे वाचलं का?
Innings Break!#TeamIndia post 2⃣4⃣0⃣ on the board!
6⃣6⃣ for KL Rahul
5⃣4⃣ for Virat Kohli
4⃣7⃣ for Captain Rohit SharmaOver to our bowlers now 👌
Scorecard ▶️ https://t.co/uVJ2k8mWSt #CWC23 | #MenInBlue | #INDvAUS | #Final pic.twitter.com/22oteriZnE
— BCCI (@BCCI) November 19, 2023
कोहली-राहुलची शानदार खेळी
गेल्या वेळीही भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. तेव्हा रोहित ब्रिगेडने 6 घडी राखून विजय मिळवला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 199 धावांवर गारद झाला आणि कोहली-राहुलच्या शानदार खेळीच्या जोरावरवरच त्या सामन्यात भारताने 41.2 षटकांमध्ये आपले लक्ष्य पूर्ण केले होते.
ADVERTISEMENT
कोहलीने सर्वाधिक धावा केल्या
भारतासाठी अंतिम सामन्यात केएल राहुलने 107 चेंडूत 66 धावांची संथ खेळी केली तर विराट कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवला 28 चेंडूमध्ये केवळ 18 धावा करता आल्या होत्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ”बंद करा तो टीव्ही…”, टीम इंडिया झाली सोशल मीडियावर ट्रोल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT