India Tour of England 2021 : सूर्यकुमार यादव, पृथ्वी शॉ ला भारतीय संघात स्थान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टीम इंडियाच्या आगामी इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान हे तीन भारतीय खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण दौऱ्याला मुकणार आहेत. त्यांच्या जागेवर बीसीसीआयने पर्यायी खेळाडू म्हणून पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान दिलं आहे.

ADVERTISEMENT

युवा सलामीवीर शुबमन गिलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपदरम्यान दुखापत झाली होती. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने आपल्या बोटाला झालेल्या जखमेसाठी इंजेक्शन आणि उपचार घेतले असले तरीही तो उर्वरित हंगाम खेळू शकणार नाहीये. आवेश खानलाही सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. ज्यानंतर या तिन्ही खेळाडूंना बीसीसीआयने परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांनी ऋषभ पंतसह सपोर्ट स्टाफमधील काही लोकांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू यानंतर सर्वांना आयसोलेट केल्यानंतर RTPCR चाचण्या करण्यात आल्या. ज्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून बीसीसीआयच्या मेडीकल टीमने पंतला खेळण्यासाठी फिट म्हणून घोषित केलं आहे.

हे वाचलं का?

Ind vs SL : टी-२० सिरीजमध्ये भारताची विजयी सुरुवात, पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर मात

इंग्लंड दौऱ्यासाठी असा असेल भारताचा संघ –

ADVERTISEMENT

रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, अभिमन्यू इश्वरन, पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव

ADVERTISEMENT

राखीव खेळाडू – प्रसिध कृष्णा आणि अरझान नागवासवाला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT