आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मिताली राज निवृत्त, ट्वीट करत दिली सेकंड इनिंगबद्दल माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार (Indian Women Captain) आणि महिला संघाची सचिन तेंडुलकर म्हणून ओळख असलेल्या मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मितालीने ट्विट करत निवृत्तीविषयी माहिती दिली आहे. ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की २३ वर्षांची माझी कारकिर्द अतिशय रोमांचक आणि मजेदार राहिली. मितालीच्या या घोषणेने संपुर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे.

मिताली राजने भारतीय महिला क्रिकेट संघासाठी 232 एकदिवसीय सामने तर 89 टी-20 सामने खेळले आहेत. तिने 12 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. मिताली राजने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7805 धावा केल्या तर टी-20 मध्ये 2364 धावा केल्या आहेत. तिने कसोटी क्रिकेटमध्येही 699 धावा आहेत. मिताली राजने एकूण 8 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. तिने एकदिवसीय सामन्यात 7 आणि कसोटीत एक शतक केले.

16 व्या वर्षी पदार्पण, शतक झळकावले

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मिताली राजने 16 वर्षांची असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 26 जून 1999 रोजी झालेल्या त्या सामन्यात मिताली राजने पदार्पणाच्या वनडेतच शतक झळकावले होते. मितालीने आयर्लंडविरुद्ध 114 धावा केल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना 161 धावांनी जिंकला.

मिताली राजचे रेकॉर्ड

ADVERTISEMENT

2017 च्या विश्वचषकात मितालीने लगातार 7 अर्धशतक करत आपल्या फलंदाजीची झलक दाखवली होती. असा विक्रम करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली होती.

ADVERTISEMENT

भारतासाठी सलग 109 सामने खेळण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2,000 हून अधिक धावा करणारी मिताली राज ही पहिली भारतीय आहे.

भारतीय संघासाठी 20 वर्षांहून अधिक काळ खेळण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे.

200 हून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी मिताली ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

भारताकडून कसोटीत द्विशतक झळकावणारी मिताली ही एकमेव महिला फलंदाज आहे. मितालीने 2002 मध्ये इंग्लंडविरुद्ध 214 धावा केल्या होत्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT