IPL 2021 : दिल्लीचं ‘पृथ्वी’अस्त्र कोलकात्यावर पडलं भारी, KKR ची निराशाजनक कामगिरी सुरुच

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्स संघाची चौदाव्या हंगामातली निराशाजनक कामगिरी सुरुच राहिलेली आहे. गुरुवारी संध्याकाळी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने KKR वर ७ विकेटने मात केली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉच्या धडाकेबाज ८२ रन्सच्या इनिंगच्या जोरावर दिल्लीने सामन्यात बाजी मारली. ४१ बॉलमध्ये पृथ्वी शॉने ११ फोर आणि ३ सिक्स लगावल्या.

ADVERTISEMENT

दिलदार पॅट कमिन्स ! करोनाविरुद्ध लढाईत पंतप्रधान सहायता निधीला भरघोस मदत

टॉस जिंकून दिल्लीने प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे कोलकात्याच्या बॅट्समनची निराशाजनक कामगिरी या सामन्यातही सुरुच राहिली. ठराविक अंतराने कोलकाता नाइट रायडर्सचे सर्व खेळाडू माघारी परतत राहिले. ओपनर शुबमन गिल आणि अखेरच्या फळीत आंद्रे रसेलने फटकेबाजी करुन KKR ला आश्वासक स्कोअर उभा करुन दिला. मोक्याच्या क्षणी पार्टनरशीप करण्यात KKR चे बॅट्समन अपयशी ठरले, ज्याचा फायदा दिल्लीने घेतला.

हे वाचलं का?

प्रत्युत्तरादाखल दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात अतिशय दणक्यात झाली. फॉर्मात असलेली जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने पहिल्या ओव्हरपासून KKR च्या बॉलर्सवर दबाव आणायला सुरुवात केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत दोन्ही बॅट्समनही बॉलर आणि फिल्डर्सना सळो की पळो करुन सोडलं. दोन्ही बॅट्समननी पहिल्या विकेटसाठी १३२ रन्सची पार्टनरशीप करत KKR च्या आव्हानातली हवाच काढून टाकली. अखेरच्या टप्प्यात पृथ्वी-शिखर आणि ऋषभ पंतला आऊट करण्यात KKR चे बॉलर यशस्वी ठरले, परंतू तोपर्यं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. स्टॉयनिस आणि हेटमायर जोडीने दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब करत पॉइंट्स टेबलमध्ये आपलं आव्हान कायम राखलं आहे.

दर दोन दिवसांनी टेस्टिंग, बाहेरील जेवणाला परवानगी नाही; BCCI कडून Bio Secure Bubble चे नियम अधिक कडक

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT