IPL 2021 : अबुधाबीत इशान किशनचं वादळ, महत्वाच्या सामन्यात विक्रमी इनिंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये दाखल होण्यासाठी अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने अखेरच्या सामन्यात आश्वासक सुरुवात केली आहे. SRH विरुद्ध सामन्यात टॉस जिंकत रोहितने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पहिला निकष पूर्ण केला. जर रोहित टॉस हरला असता तर मुंबई इंडियन्स एकही बॉल न खेळता प्ले-ऑफमधून बाहेर गेली असती.

ADVERTISEMENT

यानंतर इशान किशन आणि रोहित शर्माने चौकार-षटकारांची आतिषबाजी करत आपले इरादे स्पष्ट केले.

विशेषकरुन संपूर्ण हंगाम आपल्या खराब फॉर्मामुळे चर्चेत असलेल्या इशान किशनने SRH च्या बॉलर्सवर चौफेर हल्लाबोल करत आपलं अर्धशतक साजरं केलं. १६ चेंडूंमध्ये इशानने अर्धशतक झळकावत आपण फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं. मुंबई इंडियन्सला आजचा सामना जिंकण्यासाठी २०० पेक्षा अधिक धावांचं आव्हान देणं गरजेचं आहे.

हे वाचलं का?

या तुफान खेळीच्या जोरावर इशान किशनने अनेक विक्रमांची नोंद केली.

३२ बॉलमध्ये इशान किशनने ११ फोर आणि ४ सिक्स लगावत ८४ रन्सची इनिंग खेळली. उमरान मलिकने त्याला विकेटकिपर साहाकरवी आऊट केलं. दरम्यान रोहित शर्मानेही इशान किशनला आज चांगली साथ दिली, परंतू राशिद खानच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो १८ रन्स काढून आऊट झाला.

ADVERTISEMENT

IPL 2021 : गतविजेत्या मुंबई इंडियन्सची यंदा अशी गत का झाली? जाणून घ्या कारणं…

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT