IPL 2022 ची प्रेक्षकसंख्या घटली, Media Rights चे दर मात्र गगनाला; बीसीसीआय म्हणतं..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आयपीएलचा पंधरावा हंगाम आता उत्तरार्धाकडे सरकला असून बीसीसीआयने लगेचच 2023 ते 2027 या काळातील Media rights च्या विक्रीची तयारी सुरु केली आहे. यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा 10 संघांनिशी खेळवली जात असल्यामुळे यंदा प्रेक्षकसंख्या वाढेल असा बीसीसीआयला अंदाज होता. परंतू प्रत्यक्षात याच्या उलटच घडताना पहायला मिळालं.

ADVERTISEMENT

सध्याच्या घडीला आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क Star Sports Network कंपनीकडे आहेत. पाच वर्षांच्या प्रक्षेपणासाठी स्टार स्पोर्ट्सने 16 हजार 347 कोटी रुपये मोजले. परंतू यंदाच्या हंगामात आयपीएल सामन्यांच्या प्रेक्षकसंख्येत कमालीची घट झालेली पहायला मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यंदा Star Sports Network ला 30 ते 40 टक्क्यांचा तोटा झालेला आहे.

IPL 2022 Final Venue: अंतिम सामन्याचा मान नरेंद्र मोदी मैदानाला, BCCI सचिव जय शहांची घोषणा

हे वाचलं का?

बीसीसीआयला आयपीएल सामन्यांच्या आगामी पाच वर्षांच्या Media Rights साठी 32 हजार 980 कोटींची अपेक्षा आहे. बीसीसीआयला अपेक्षित असणारी रक्कम ही सध्याच्या रकमेपेक्षा दुप्पट आहे. परंतू यासाठी शर्यतीत उतरलेल्या कंपन्यांना ही किेंमत जास्त वाटत आहे.

BCCI ला यंदा अपेक्षित असलेली किंमत ही खूपच जास्त आहे. ज्या हंगामात प्रेक्षकसंख्या ही जवळपास 34 टक्क्यांनी घसरलेली असताना Media Rights ची नव्याने विक्री आणि त्यासाठी लावण्यात आलेल्या किमतीचा एकदा विचार करणं गरजेचं असल्याचं मत, Sony Sports Network सीईओ आणि एमडी एन.पी.सिंग यांनी व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी मात्र Media Rights च्या वाढलेल्या किमतीचं समर्थन केलं आहे. “यंदा प्रेक्षकसंख्या कमी झाली आहे यात शंका नाही परंतू ही चिंता करण्याची गोष्ट नक्कीच नाही. सामन्यांच्या प्रसारण हक्कांच्या विक्रीवर याचा परिणाम होईल असं मला वाटत नाही”, पटेल हिंदुस्थान टाईम्सशी बोलत होते.

ADVERTISEMENT

वृद्धीमान साहाला धमकी, पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्यावर BCCI कडून दोन वर्षांची बंदी

कोविड 19 चे निर्बंध उठवण्यात आल्यानंतर आता लोकांचा फिरण्याकडे आपला कल दिसत आहे. अनेकदा लोकं रेस्टॉरंट-पब किंवा क्लबमध्ये सामना पाहतात. त्यामुळे एका टीव्ही कनेक्शनवर शेकडो लोकं सामने पाहत असतात, अशा कारणांमुळे यंदा आयपीएल सामन्यांच्या प्रेक्षकसंख्येत घट झाल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं.

आयपीएल सामन्यांच्या आगामी पाच वर्षांच्या हंगामाचे प्रसारण हक्क विकत घेण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. टीव्ही कंपन्यांसोबतच ऑनलाईन स्ट्रिमींग क्षेत्रात कार्यरत असलेल्या Fan-code, Amazon prime, Disney यांनीही शर्यतीत उडी घेण्याचं ठरवलं आहे. ज्यातून बीसीसीआयला 40 हजार कोटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IPL 2022 : पहिल्या विजयानंतर मुंबईचा हुरुप वाढला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT