PBKS vs GT : तेवतिया ठरला ‘बाजीगर’! दोन अवर्णनीय षटकार अन् पंजाबचा खेळ खल्लास
‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’ अशाच अंदाजात राहुल तेवतियाने धडाकेबाज खेळी करत पंजाबच्या तोंडून विजयाचा घास हिसकावला. शेवटच्या दोन चेडूंवर डोळ्यांची पारण फेडणारे दोन षटकार खेचत तेवतियाने गुजरात हातून निसटत असणारा विजय खेचून आणला. प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणाऱ्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून […]
ADVERTISEMENT

‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं’ अशाच अंदाजात राहुल तेवतियाने धडाकेबाज खेळी करत पंजाबच्या तोंडून विजयाचा घास हिसकावला. शेवटच्या दोन चेडूंवर डोळ्यांची पारण फेडणारे दोन षटकार खेचत तेवतियाने गुजरात हातून निसटत असणारा विजय खेचून आणला. प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणाऱ्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ गडी राखून विजय मिळवला.
आयपीएलच्या १५व्या हंगामात प्रेक्षकांना रोमहर्षक सामना बघायला मिळाला. पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्या झालेल्या सामन्यात अखेरच्या दोन चेंडूंवर सामन्याचा निकालच बदलला. पंजाब किंग्जने गुजरात टायटन्ससमोर १९० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने २० षटकात यशस्वी पाठलाग केला.
Sadda Gill bhi tu, Saddi jaan bhi tu! ?#PBKSvGT | #AavaDe | #TATAIPL pic.twitter.com/HNOSyJt8ZS
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 8, 2022
१९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून सलामीला शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड मैदानात आले. संघाची धावसंख्या ३२ असताना मॅथ्यू वेड बाद झाला. त्यानंतर पहिलाच सामना खेळत असलेल्या साई सुदर्शनने नेत्रदीपक खेळी करत सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. गिल आणि सुदर्शनने दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची भागीदारी केली.
सुदर्शन ३२ धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या खेळण्यास आला. त्याचवेळी शतकाच्या उंबरठ्यावर असणारा शुभमन गिल झेलबाद झाला. गिलने ५९ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९६ धावा केल्या. रबाडाने शुभमन गिलला तंबूचा रस्ता दाखवला.









