IPL 2022 : मुंबई इंडियन्सला धक्का, सूर्यकुमार दुखापतीमुळे दिल्लीविरुद्धचा सामन्याला मुकणार
श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा आगामी आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. २७ मार्चला मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. परंतू या सामन्याआधीच मुंबईसमोरचं संकट वाढलेलं दिसत आहे. मुंबईचा भरवशाचा खेळाडू सूर्यकुमार यादव अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे दिल्लीविरुद्ध सामन्याला मुकण्याचे संकेत मिळत आहेत. श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेदरम्यान फिल्डींगदरम्यान सूर्यकुमारच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सूर्यकुमारवर […]
ADVERTISEMENT

श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा आगामी आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. २७ मार्चला मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. परंतू या सामन्याआधीच मुंबईसमोरचं संकट वाढलेलं दिसत आहे. मुंबईचा भरवशाचा खेळाडू सूर्यकुमार यादव अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे दिल्लीविरुद्ध सामन्याला मुकण्याचे संकेत मिळत आहेत.
श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिकेदरम्यान फिल्डींगदरम्यान सूर्यकुमारच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सूर्यकुमारवर सध्या NCA मध्ये उपचार होत आहेत. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळेल याची शक्यता कमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या संपूर्ण हंगामाचा विचार केला असता मुंबई इंडियन्सचं टीम मॅनेजमेंट सूर्यकुमारला दुखापतीमधून सावरण्याची पूर्ण सवलत देणार असल्याचं कळतंय. २७ तारखेला दिल्लीविरुद्ध सामना झाल्यानंतर मुंबईचा दुसरा सामना २ एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.
या दिवसांमध्ये सूर्यकुमार यादव दुखापतीमधून सावरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.
प्रत्येक इनिंगमध्ये दोन DRS ते सुपर ओव्हर; IPL 2022 साठी नियमांमध्ये महत्वाचे बदल
सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू मानला जातो. त्यामुळेच यंदाच्या हंगामात मुंबईने सूर्यकुमारला रोहित, बुमराह आणि पोलार्डसोबत संघात कायम राखलं होतं. आयपीएल हंगामासोबतच आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने सूर्यकुमार यादवचं फिट असणं गरजेचं आहे, त्यामुळे तो आगामी काळात या दुखापतीमधून कसा सावरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.