IPL 2023 Final, GT vs CSK : पावसामुळे सामना रद्द झाला, कोणता संघ ठरणार विजेता?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ipl 2023 gt vs csk final weather pitch report ahmedabad cricket stadium ms dhoni hardik pandya
ipl 2023 gt vs csk final weather pitch report ahmedabad cricket stadium ms dhoni hardik pandya
social share
google news

GT vs CSK Pitch Report Weather Ahmedabad : आयपीएलमध्ये आज रविवार 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super king) आणि गुजरात टायटन्समध्ये (Gujrat Titans) फायनल सामना खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार होता मात्र पावसामुळे सामना रद्द होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. जर पावसामुळे सामना रद्द झाला तर कोणता संघ विजयी ठरणार, हेच जाणून घेऊयात. (ipl 2023 gt vs csk final weather pitch report ahmedabad cricket stadium ms dhoni hardik pandya)

पावसाचा अंदाज काय?

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 मे रोजी अहमदाबादच्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ असेल. मात्र, Accuweather च्या अहवालानुसार अहमदाबादमध्ये रविवारी संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी संध्याकाळी पावसाची 40 टक्के शक्यता आहे.अहमदाबादमध्ये एकूण दोन तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. सूर्यास्तानंतर पावसासह संध्याकाळी 50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे.

हे ही वाचा : IPLच्या विजेत्या, उपविजेत्या संघावर बक्षिसांची लयलूट! किती Prize Money मिळणार?

फायनलसाठी रिजर्व डे आहे का?

आयपीएल 2022 च्या फायनल सामन्यासाठी राखीव दिवस होता, परंतु बीसीसीआयने जाहिर केलेल्या प्लेऑफ वेळापत्रकानुसार यंदा आयपीएल 2023 फायनलसाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यामुळे आयपीएलचा अंतिम विजेता ठरलेल्या सामन्याच्या दिवशीच (रविवार, 28 मे) ठरवला जाणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सामन्यासाठी अतिरिक्त वेळ?

फायनल सामन्यासाठी रिजर्व डे नसला तरी सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 120 मिनिटे किंवा दोन तास उपलब्ध असतील. जर आयपीएल 2023 चा अंतिम सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला, तर कमीत कमी पाच षटकांच्या सामन्यांसाठी कट ऑफ वेळ रात्री 11.56 पर्यंत असेल. जर सामना रात्री 8 वाजता सुरू झाला, तर पाच ओव्हरची कट ऑफ वेळ 12:26 पर्यंत असेल. म्हणजेच या वेळेपर्यंत अंपायर्स किमान पाच ओव्हर्सच्या सामन्याची वाट पाहतील.

हे ही वाचा : Akash Madhwal :MIचं सेमी फायनलचं तिकीट कापणारा आकाश माधवाल कोण?

पावसामुळे सामना रद्द झाला तर…

जर कोणताही संघ पहिला डाव पुर्ण ओव्हर खेळला तर डकवर्थ लुईस नियमानुसार दुसऱ्या टीमला 5 ओव्हर खेळाव्या लागतील. तसेच संघाने पाच ओव्हर खेळल्यानंतर सामना पावसामुळे रद्द झाला तर, विजेता ठरवण्यासाठी डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाईल. तसेच पावसामुळे दोन्ही किंवा कोणताही एक संघ पाच ओव्हर खेळू शकला नाही आणि कट ऑफ टाइम ओलांडल्यानंतर पाऊस थांबला, तर काही नियमांचा वापर होऊ शकतो. हे नियम जाणून घेऊया…

ADVERTISEMENT

दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवली जाईल आणि सुपर ओव्हरमध्ये कोणता संघ चॅम्पियन होईल हे ठरविले जाईल. आणि जर सुपर ओव्हरला परवानगी नसेल, तर साखळी फेरीत गुणतालिकेत अव्वल असलेला संघ विजेता मानला जाईल. साखळी फेरीअखेर गुजरात 20 गुणांसह अव्वल, तर चेन्नई (Chennai Super king) 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होते. पावसामुळे सामना अजिबातच झाला नाही तर गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला चॅम्पियन घोषित केले जाईल.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : महेंद्र सिंह धोनी आणि रविंद्र जडेजामध्ये वाद शिगेला? नवीन व्हिडिओ आला समोर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT