IPL 2024 : लिलावानंतर ‘या’ संघाची वाढली ताकद, पाहा आयपीएलच्या 10 संघाचे संपूर्ण स्क्वॉड
आयपीएलच्या मिनी ऑक्शन लिलावात 332 खेळाडूंवर बोली लावली जाणार होती, परंतु सर्व 10 संघांना फक्त 77 जागा रिक्त होत्या. अशा स्थितीत केवळ 72 खेळाडू विकले गेले होते, त्यापैकी 30 विदेशी खेळाडू होते. या 72 खेळाडूंवर सर्व 10 संघांनी 230 कोटी आणि 45 लाख रुपये खर्च केले होते
ADVERTISEMENT

IPL 2024 10 Teams Full Squad : आयपीएल 2024 चा मिनी ऑक्शन लिलाव मंगळवारी दुबईत पार पडला. या लिलावात आयपीएल संघानी 230 कोटी रूपये खर्चुन 72 खेळाडूंची खरेदी केली. त्यामध्ये चेन्नईच्या ताफ्यात 6, दिल्लीत 9, गुजरातने 8, कोलकाता 10, लखनऊने 6, मुंबईने 8, पंजाबने 8, राजस्थानने 5, बंगळुरूने 6 आणि हैदराबादने 6 खेळाडूंची खरेदी केली. या लिलावानंतर आयपीएलच्या 10 संघाची संपूर्ण टीम तयार झाली आहे. या टीमनुसार आता कोणता संघ सर्वात जास्त मजबूत आणि कमकुवत झाला आहे. हे जाणून घेऊयात. (ipl 2024 auction ipl 10 team full squad retain and sold player full list)
आयपीएलच्या मिनी ऑक्शन लिलावात 332 खेळाडूंवर बोली लावली जाणार होती, परंतु सर्व 10 संघांना फक्त 77 जागा रिक्त होत्या. अशा स्थितीत केवळ 72 खेळाडू विकले गेले होते, त्यापैकी 30 विदेशी खेळाडू होते. या 72 खेळाडूंवर सर्व 10 संघांनी 230 कोटी आणि 45 लाख रुपये खर्च केले होते.त्यामुळे शेवटच्या लिलावानंतर कोणता संघ मजबूत आणि कमकुवत झाला हे खालील दिलेल्या 10 फ्रँचायझीं टीममधुन पाहूयात.
हे ही वाचा : Mla Disqualification : 7 ठरावांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवलं, शिंदेंच्या वकिलांनी पकडलं कात्रीत
चेन्नई सुपर किंग्ज
रिटेन खेळाडू : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकिपर), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे (विकेटकिपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे,ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हुंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी आणि महेश तिक्ष्णा.
ऑक्शनमध्ये खरेदी केलेले खेळाडू : रचिन रवींद्र (1.80 कोटी), शार्दुल ठाकूर (4 कोटी), डॅरिल मिशेल (14 कोटी), समीर रिझवी (8.4 कोटी), मुस्तफिजुर रहमान (2 कोटी) आणि अवनीश राव अरवेली (20 लाख)