IPL 2024 : सामना सुरू असताना असं काय घडलं की, रोहित-ईशानला फुटला घाम? बघा Video

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rohit Sharma Fan Breaches IPL Security : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या सीझनमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) संघाची कामगिरी अत्यंत वाईट आहे. संघाने अद्याप एकही विजय मिळवलेला नाहीये. त्यांनी आतापर्यंत खेळलेले तीनही सामने हरले आहेत. तिसरा सामना सोमवारी (1 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. (IPL 2024 What Happend With Rohit Sharma And Ishan Kishan in IND vs RR Match Video Gets Viral)

या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने (RR) 6 गडी राखून विजय मिळवला. पण या सामन्यात एक विचित्र घटनाही घडली. यावेळी खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक पाहायला मिळाली. हे सर्व पहिल्यांदा नसून दुसऱ्यांदा घडलं आहे. 

रोहित शर्मा आणि ईशान किशनचा चाहत्याने केला पाठलाग

सामना सुरू असताना एक चाहता मैदानात घुसला. यावेळी त्याने रोहित शर्मा आणि ईशान किशनचा पाठलाग केला. तेव्हा रोहित स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता आणि ईशान विकेटकीपिंग करत होता. अचानक त्यांच्या पाठीमागे या प्रेक्षकाला पाहून रोहित आणि ईशान दोघंही घाबरलेले दिसले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्या प्रेक्षकाने रोहितला मिठी मारली. त्यानंतर ईशानचीही गळाभेट घेतली. हे पाहता सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी प्रेक्षकाला पकडून मैदानाबाहेर नेले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशाप्रकारे, आयपीएल आणि खेळाडूंच्या सुरक्षेत दुसऱ्यांदा ही मोठी चूक घडली.

याआधी एकाने कोहलीलाही केलं होतं टार्गेट

गेल्या सीझनमध्येही अशीच एक घटना घडली होती. जेव्हा एक चाहता अशाच पद्धतीने मैदानात घुसला होता. ही घटना 25 मार्च रोजी बंगळुरू सामन्यात पाहायला मिळाली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाब किंग्जचा (PBKS) 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहली फलंदाजी करत असताना अचानक एक चाहता त्याच्यापर्यंत पोहोचला.

ADVERTISEMENT

तो थेट कोहलीकडे गेला आणि त्याच्या पाया पडला. त्या चाहत्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केला. सुरक्षारक्षकही त्याच्या मागे धावत आले. एकाने तर त्याला उचलले. पण त्यानंतर त्या चाहत्याने कोहलीला पकडले. तेवढ्यात मागून दुसरा सुरक्षा रक्षक आला आणि त्याने प्रेक्षकाला पकडून बाहेर नेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT