LSG vs DC: हरलेला सामना जिंकून दिला, कोण आहे आशुतोष शर्मा ज्याने लखनऊच्या विजयाचा घास घेतला हिरावून
IPL 2025: लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रोमांचक सामन्यात दिल्लीने थरारक विजय मिळवला. या सामन्याचा हिरो ठरला तो आशुतोष शर्मा. जाणून घ्या कोण आहे आशुतोष.
ADVERTISEMENT

Who is Ashutosh Sharma: IPL 2025 मधील एक रोमांचक सामना आज (24 मार्च) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर रंगला. लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या या थरारक लढतीत दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या ओव्हरपर्यंत चुरस कायम ठेवत 1 गडी राखून विजय मिळवला. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 209 धावा केल्या, तर दिल्लीने 20 षटकांत 9 बाद 211 धावा करत हा सामना जिंकला. या सामन्यात दिल्लीचा युवा खेळाडू आशुतोष शर्मा हा विजयाचा नायक ठरला.
सामन्याचा रोमांच
दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर लखनऊ सुपर प्रथम फलंदाजीना करताना निकोलस पूरन (75 धावा) आणि मिचेल मार्श (72 धावा) यांनी संघाला 209 धावांपर्यंत पोहोचवलं. दिल्लीच्या गोलंदाजांपैकी मिचेल स्टार्कने 3 घेत लखनऊला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं, तर कुलदीप यादवनेही 2 विकेट्स घेतल्या.
हे ही वाचा>> CSK vs MI: मुंबई इंडियन्सच्या 4 दिग्गज फलंदाजांना माघारी पाठवणारा नूर अहमद आहे तरी कोण?
प्रत्युत्तरात दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 65 धावांवरच दिल्लीने आपले 5 गडी गमावले. दरम्यान, शेवटच्या 5 षटकांत 60 धावांची गरज असताना सामना लखनऊच्या बाजूने झुकताना दिसत होता. पण याच वेळी आशुतोष शर्माने मैदानावर पाऊल ठेवलं आणि खेळाचं चित्र बदललं. त्याने 31 चेंडूंमध्ये 66 धावांची नाबाद खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला. शेवटचा फलंदाज शिल्लक असतानाही आशुतोषने अतिशय जिगरबाज फटकेबाजी करत दिल्लीला एक हाती विजय मिळवून दिला.
कोण आहे आशुतोष शर्मा?
आशुतोष शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख खेळाडू आहे, जो आपल्या आक्रमक फलंदाजी आणि दबावाखाली खेळण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो. त्याचा जन्म 15 सप्टेंबर 1998 रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला. डावखुरा फलंदाज असलेला आशुतोष मधल्या आणि खालच्या फळीत फिनिशरची भूमिका प्रभावीपणे निभावतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश आणि रेल्वेसाठी खेळताना आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.










