Shubham Dubey : ग्लोव्हज घ्यायला नव्हते पैसै, विदर्भाच्या पठ्ठ्याला IPL मध्ये मिळाले कोट्यवधी

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ipl auction 2024 shubham dubey buy rajasthan royals 580 crore nagpur boy vidarbha cricket team struggle story
ipl auction 2024 shubham dubey buy rajasthan royals 580 crore nagpur boy vidarbha cricket team struggle story
social share
google news

Rajasthan Royals Bought Shubham Dubey in 5.80 Crore : आयपीएल 2024 साठी (IPL Auction 2024) खेळाडूंचा लिलाव नुकताच दुबईत पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell starc)  हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यापाठोपाठ त्याचाच सहकारी पॅट कमिन्स (Pat Cummins) हा दुसरा महागडा खेळाडू ठरलाय. या लिलावात स्टार खेळाडूंसह काही अनकॅप्ड खेळाडूंचे देखील नशीब पालटले आहे. यामध्ये नागपूरच्या शुभम दुबेचाही (Shubham Dubey) समावेश होतो. शुभम दुबेकडे एकेकाळी क्रिकेटचे ग्लोव्हज खरेदी करायला पैसे नव्हते. मात्र आयपीएलमुळे त्याचे नशीब चमकलं आहे. कारण राजस्थान रॉयल्सने शुभमला 5 कोटी 80 लाख रुपयांना खरेदी केले आहे. दरम्यान अत्यंत बिकट परिस्थितीतून वर आलेला शुभम दुबे आयपीएल पर्यंत कसा पोहोचला? त्याची संघर्ष कहानी काय आहे? हे जाणून घेऊयात.(ipl auction 2024 shubham dubey buy rajasthan royals 580 crore nagpur boy vidarbha cricket team struggle story)

कोण आहे शुभम दुबे?

शुभम दुबे (Shubham Dubey) हा नागपूरचा रहिवासी आहे. तो विदर्भ संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. शुभम दुबेचे वडील पानटपरीचा व्यवसाय करतात. अत्यंत हलाखीचे जीवन शुभम जगला आहे. एकेकाळी शुभमकडे क्रिकेट खेळण्यासाठी ग्लोव्हज घ्यायला देखील नव्हते. मात्र त्याची स्वप्न मोठी होती, त्यामुळेच तो आयपीएलच्या मैदानापर्यंत पोहोचू शकला आहे.

हे ही वाचा : Jitendra Awhad : “महाराष्ट्रात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, RSSचा निर्णय”

राजस्थानच्या ताफ्यात

दरम्यान मंगळवारी पार पडलेल्या आयपीएलच्या लिलावात 20 लाख रुपये मूळ किंमत असलेल्या शुभमला राजस्थान रॉयल्सने 5 कोटी 80 लाख रुपयांच्या मोठ्या रकमेत आपल्या संघात सामील करून घेतले. तेव्हापासून शुभमच्या कुटुंबात आनंदाची लाट पसरली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हा खूप चांगला अनुभव आहे. कदाचित मला सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये या हंगामात कामगिरी करण्याचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच लिलावात निवड होईल अशी माझी अपेक्षा होती, पण खरं सांगायच झालं तर मला इतक्या मोठ्या रक्कमेची अपेक्षा नव्हती, असे शुभमने स्पोर्ट्स तकशी बोलताना सांगितले.

हे ही वाचा : Parliament: “मोदी-शाहांनी डॉ. आंबेडकर, सरदार पटेलांनाही…”, ठाकरेंचा घणाघाती हल्ला

या दरम्यान शुभमला त्याच्या संघर्षाचे दिवसही आठवले. यावेळी शुभमने त्याचे दिवंगत गुरू सुदीप जैस्वाल यांचीही आठवण काढली. शुभम पुढे म्हणाला की, एकेकाळी आमची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती आणि माझ्याकडे ग्लोव्हज घेण्यासाठीही पैसे नव्हते. त्याने (सुदीप) मला नवीन बॅट आणि पूर्ण किट दिली. यानंतर मला अंडर-19, अंडर-23 आणि ‘अ’ डिव्हिजन संघात खेळण्याची संधी मिळाली. आज मी जो काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे, असे शुभमने सांगितले. तसेच सुदीप हा वकील होता आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत खेळाडूंना टॅलेंट असल्यास मदत करत असे. 2021 ला कोविड-19 मुळे सुदीपचा मृत्यू झाला होता, असे देखील शुभमने सांगितले.

ADVERTISEMENT

टी20 करिअर

27 वर्षीय डावखुरा फलंदाज शुभम दुबेने 7 टी-20 सामन्यांमध्ये 187 पेक्षा जास्त स्ट्राइक रेट आणि 74 च्या मजबूत सरासरीने 222 धावा केल्या होत्या. या काळात शुभमच्या बॅटमधून 10 चौकार आणि 18 षटकार मारले गेले. इतकंच नाही तर विदर्भासाठी T20 क्रिकेटमध्ये 18 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा संयुक्त विक्रमही त्याच्या नावावर आहे.

ADVERTISEMENT

शुभमने विदर्भासाठी आतापर्यंत 20 टी-20 सामन्यांच्या 19 डावात 485 धावा केल्या आहेत, तर एकूण 30 षटकार ठोकले आहेत. आता राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल 2024 च्या मोसमात तो आपल्या बॅटने कसा चमत्कार करतो हे पाहावे लागेल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT