योगायोग! 100 वी टेस्ट खेळणाऱ्या इशांतची कपिल देव यांच्याशी बरोबरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय संघाचा अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्माच्या टेस्ट करिअरमधला आजचा दिवस हा महत्वपूर्ण मानला जात आहे. जगातील सर्वात मोठं मैदान असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर इशांत शर्मा आपल्या टेस्ट करिअरमधली १०० वी टेस्ट खेळतो आहे. डे-नाईट टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडचा कॅप्टन जो रुटने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. इशांत शर्माने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत इंग्लंडचा ओपनर डोम सिबललेला शून्यावर कॅचआऊट करत इंग्लंडला पहिला धक्का दिला.

या विकेटसोबत इशांतने तब्बल ३२ वर्षांपूर्वी कपिल देव यांनी केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. १९८९ साली कपिल देव यांनी आपल्या टेस्ट करिअरमधला १०० वा सामना खेळला तो पाकिस्तानविरुद्ध. कराचीच्या मैदानावर कपिल देव यांनी पाकिस्तानचा ओपनर अमर मलिकला मोहम्मद अझरुद्दीनच्या हाती कॅच द्यायला भाग पाडत शून्यावर आऊट केलं होतं. यानंतर तब्बल ३२ वर्षांनी इशांतने याच कामगिरीची पुनरावृत्ती करत सिबलेची विकेट घेतली.

इशांत शर्माने सिबलेला आऊट केल्यानंतर ठराविक अंतराने अक्षर पटेलनेही जॉनी बेअरस्टोला आपल्या जाळ्यात अकडवलं. दरम्यान सामन्याला सुरुवात होण्याआधी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते या मैदानाचं उद्घाटन करण्यात आलं. वर्ल्ड टेस्ट चँपिअनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही संघांना या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT