Ind vs Eng : खेळाडूंमधले राडे थांबता थांबेना ! आता भर मैदानात भिडले बुमराह आणि बटलर, पाहा व्हिडीओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Lord’s कसोटीच्या अखेरच्या दिवसापर्यंत भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमधले वाद थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. अखेरच्या दिवशी इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलर आणि भारताच्या जसप्रीत बुमराहमध्ये मैदानात वादावादी झाली.

ADVERTISEMENT

भारतीय संघ फलंदाजी करत असताना मार्क वुडच्या ९२ व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बुमराह आणि बटलर यांच्यात शाब्दीक वाद झाला ज्यातून बुमराहने बटलरला हळू टॉक म्हणून मी तक्रार करत नव्हतो असं सुनावलं. स्टम्प माईकमध्ये हा आवाज रेकॉर्ड झाला आहे.

यावेळी मैदानातील अंपायर्सही या भांडणात वेळेत हस्तक्षेप करत दोघांनाही वेगळं केलं. परंतू इंग्लंडचा बॉलर मार्क वुड बुमराहला उद्देशून आपला राग काढतच होता. बुमराहने मार्क वुडच्या बॉलिंगवर खणखणीत चौकार लगावत त्याला प्रत्युत्तर दिलं. ज्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये बसलेल्या विराट कोहलीचाही संताप अनावर झालेला पहायला मिळाला.

हे वाचलं का?

Ind vs Eng 2nd Test : भर मैदानात भिडले कोहली-अँडरसन, वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने बाऊन्सर बॉल टाकून जेम्स अँडरसनला हैराणं केलं होतं. ज्यानंतर दोघांमध्ये छोटासा वाद झाला. या वादाचे पडसाद शेवटच्या दिवसापर्यंत मैदानावर उमटताना पहायला मिळाले. दरम्यान शमी आणि बुमराह यांनी भागीदारी करत अखेरच्या दिवशी इंग्लंडला चांगलंच झुंजवलं.

ADVERTISEMENT

Video : क्रिकेटच्या पंढरीत प्रेक्षकांचं लाजिरवाणं कृत्य, लोकेश राहुलला फेकून मारले शॅम्पेन कॉर्क

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT