GOAT Lionel Messi चे जय शाहंना ‘खास’ गिफ्ट : माजी क्रिकेटरने फोडलं सिक्रेट
(Lionel Messi Gift to Jay Shah) GOAT लिओनेल मेस्सीने फिफा वर्ल्डकप विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना एक खास गिफ्ट पाठवलं आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने त्याच्या सोशल मिडियावरुन गिफ्टची पोस्ट शेअर करत हे सिक्रेट जगासमोर आणलं आहे. स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. यात अगदी सामान्य लोकांपासून […]
ADVERTISEMENT
(Lionel Messi Gift to Jay Shah)
ADVERTISEMENT
GOAT लिओनेल मेस्सीने फिफा वर्ल्डकप विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना एक खास गिफ्ट पाठवलं आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आणि माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने त्याच्या सोशल मिडियावरुन गिफ्टची पोस्ट शेअर करत हे सिक्रेट जगासमोर आणलं आहे.
स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचे जगभरात असंख्य चाहते आहेत. यात अगदी सामान्य लोकांपासून ते राजकारणी आणि सेलिब्रेटी लोकांचा समावेश आहे. या चाहत्यांच्या यादीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचंही नावं आहे. मेस्सीनेही आपल्या या चाहत्याची आठवण ठेवत एक खास गिफ्ट पाठवलं आहे. मेस्सीने जय शाह यांना विश्वचषक विजेती जर्सी ऑटोग्राफसह भेट दिली आहे.
हे वाचलं का?
प्रज्ञान ओझाने जय शाहंसोबत या जर्सीचा फोटो पोस्ट करत लिहिले, ‘GOAT ने जय भाईसाठी शुभेच्छा आणि स्वाक्षरी असलेली मॅच जर्सी पाठवली आहे! किती नम्र व्यक्तिमत्व. मला माझ्यासाठी एक मिळेल अशी आशा आहे… लवकरच.’
ADVERTISEMENT
कतारमधील लुसेल स्टेडियमवर फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं. सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटमधून झाला. सामन्याची नियोजित वेळ संपली त्यावेळी स्कोअर 3-3 असा बरोबरीत होतात. फ्रान्ससाठी या सामन्यात एमबाप्पेने हॅट्ट्रिक केली तर लिओनेल मेस्सीने 2 गोल केले. अर्जेंटिनाने हा विश्वचषक पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकत 36 वर्षांचा दुष्काळ संपवला. यानंतप विश्वचषक जिंकण्याचं लिओनेल मेस्सीचे स्वप्न पूर्ण झालं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT