Mohammed Shami: तीन वेळा आत्महत्येचा विचार… संघर्षातून असा घडला मोहम्मद शमी!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mohammed shami picks 7 wicket against new zealand semi final shami try to commit suicide struggle story odi world cup 2023
mohammed shami picks 7 wicket against new zealand semi final shami try to commit suicide struggle story odi world cup 2023
social share
google news

Mohammed Shami Wanted to Commit Suicide : मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर आलेल्या मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) गोलंदाजीच्या वादळाने न्युझीलंडचा (New Zealand) सेमी फायनलमध्ये (Semi Final) पराभव झाला आहे. मोहम्मद शमीने एकट्याने न्युझीलंडचे 7 खेळाडू तंबूत परतवले. ज्यामुळे टीम इंडियाचा विजय सहज सोप्पा झाला. शमीने या सामन्यात 9.5 ओव्हरमध्ये 57 धावा देत 7 विकेट घेतल्या. या त्याच्या कामगिरीची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. ही चर्चा सूरू असताना मोहम्मद शमीच्या संघर्षाच्या कहानीची चर्चा रंगली. शमीच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. बायकोसोबतही त्याला तलाक झाला होता. आयुष्यात इतकी सगळी वादळ येऊनही तो खचला नाही, तो पुन्हा उभा राहिला आणि त्याने स्वतः ला सिद्ध करून दाखवले. (mohammed shami picks 7 wicket against new zealand semi final shami try to commit suicide struggle story odi world cup 2023)

शमी काय म्हणाला?

मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहोचण्याचा इतका सोप्पा नव्हता. या प्रवासात त्याला अनेक अडीअडचणी आल्या. शमीच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येत होता. एक दोनदा नव्हे तर तीनदा त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता.

हे ही वाचा :क्रूरतेची हद्द! घरात घुसून सामूहिक बलात्कार, अंगावर दिले सिगारेटचे चटके

या कठीण प्रसंगावर बोलताना मोहम्मद शमी (Mohammed Shami) म्हणाला, 2015 हे वर्ष माझ्यासाठी सर्वात कठीण होते, ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड कपमध्ये दुखापत झाल्यानंतर शमीला जवळपास 18 महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले. पुढे शमी म्हणतो, ‘जेव्हा मी पुन्हा खेळायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी आल्या. मला असे वाटते की जर माझ्या कुटुंबाने मला साथ दिली नसती तर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो, मी तीन वेळा आत्महत्येचा विचारही केला, असा खळबळजनक खुलासा शमीने केला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

…तरीही बेंचवर बसवलं

शमी वर्ल्ड कप 2023 संघाचा भाग होता, परंतु सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. हार्दिक पांड्याच्या दुखापतीनंतर शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने करून दाखवले. त्याने वर्ल्ड कपमधल्या तीन सामन्यात 5 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत.

हे ही वाचा :Crime News: धावत्या ट्रेनमधून तरुणाला फेकलं, लातूर स्थानकातील धक्कादायक प्रकार!

शमीच्या ‘त्या’ ओव्हरने फिरवली मॅच

टीम इंडियाने दिलेल्या 398 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या न्युझीलंडला शमीलाच सुरुवातीला दोन धक्के दिले. त्यानंतर केन विल्यमसन आणि डेरेन मिचेल जोडीने डाव सावरला होता. एकेकाळी टीम इंडियाची हातून सामना जातोय की काय अशी अवस्था होती.मात्र शमीने पुन्हा गोलंदाजीने कहर करत एकाच ओव्हरमध्ये केन विल्यमसन आणि टॉम लॅथम या दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आणि इथूनच पुन्हा मॅच टीम इंडियाच्या पारड्यात आली. शमीने 9.5 ओव्हरमध्ये 57 धावांत 7 विकेट घेतल्याने किवीजचा डाव 48.5 षटकांत 327 धावांत आटोपला. यासोबतच शमीने या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्सही घेतल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT